घरमहाराष्ट्रनागपूरMaharashtra Politics : भुजबळांमागे अदृष्य हात, विजय वडेट्टीवारांचा कोणाकडे इशारा?

Maharashtra Politics : भुजबळांमागे अदृष्य हात, विजय वडेट्टीवारांचा कोणाकडे इशारा?

Subscribe

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराजा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे ओबीसी समाज आक्रमक झाला असून ओबीसी नेत्यांनी एल्गार सभा घेत मराठा आरक्षणाला विरोध करण्याचा प्रयत्न केला आहे. एल्गार सभेत अजित पवार गटाचे ज्येष्ठ छगन भुजबळ आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी एकाच मंचावर होते. मात्र त्यांनी सभेनंतर छगन भुजबळांवर टीका केली आहे. (Maharashtra Politics Invisible hand behind Bhujbal Vijay Wadettiwars warning to whom BJP)

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे यांनी दुसऱ्यांदा आमरण उपोषण केलं. राज्य सरकारने मनोज जरांगेंच्या आंदोलनाची दखल घेत आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी दोन महिन्यांची मुदत मागितली आहे. मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतर राज्य सरकार कामाला लागलं असून  आहे. ज्या मराठा कुटुंबाकडे कुणबी नोंदी आहेत अशांना कुणबी जातप्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे मराठा कुटुंबांचा कुणबी जातप्रमाणपत्रासह ओबीसी आरक्षणात समावेश केला जाणार आहे. मात्र राज्यातील ओबीसी नेत्यांनी या गोष्टीला विरोध केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शिवसेनेची मशाल घेऊन महाराष्ट्रभर फिरत आहे, फोटो शेअर करत अंधारेंनी भुजबळांना करून दिली आठवण

कुणबी जातप्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ आणि मनोज जरांगे आमनेसामने आले आहेत. दोघेही एकमेकांवर आरोप करत असतानाच छगन भुजबळांच्या नेतृत्वात जालन्यातल्या अंबड येथे ओबीसी नेत्यांची एल्गार सभा पार पडली. काँग्रेसमधील ओबीसी नेते आणि राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हेदेखील या एल्गार सभेत सहभागी झाले होते. त्यांनी भुजबळांसोबत एल्गार सभेत भाषण केलं. मात्र या सभेनंतर वडेट्टीवार यांनी भुजबळांवर टीका केली आहे.

- Advertisement -

भुजबळांच्या भूमिकेला समर्थन नाही

छगन भुजबळ हे मनोज जरांगें विरोधात खूप आक्रमक झाले आहेत. ते मनोज जरांगेंचा एकेरी उल्लेख करत असून वैयक्तिक टीका करत आहेत. मनोज जरांगेंच्या आंदोलनावर टीका करताना भुजबळांनी गंभीर आरोप केले आहेत. परंतु भुजबळांच्या या भूमिकेला आपलं समर्थन नाही, असे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले की, मी माझी स्वतःची आणि पक्षाची भूमिका घेऊन पुढे जाणार आहे. भुजबळांचा पक्ष वेगळा आहे, त्यांचे विचार वेगळे असून भूमिकाही वेगळ्या आहेत. मी ओबीसींसाठी लढणारा कार्यकर्ता आहे. परंतु, ते करत असताना इतरांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, अशी आमची भूमिका आहे.

हेही वाचा – महाराष्ट्रासह देशात थंडीचा कडाका वाढला; ‘या’ राज्यातील हवामान बदलणार

भुजबळांच्या मागे अदृष्य हात असेल तर…

दरम्यान, मनोज जरांगे यांच्याविरोधात आंदोलन करण्यासाठी छगन भुजबळांवर भाजपाचा दबाव असल्याचा आरोप होत आहे. यावर भाष्य कतराना विजय वडेट्टीवार म्हणाले की, अशी चर्चा मीदेखील ऐकली आहे. परंतु मी विरोधी पक्षनेता आहे. त्यामुळे कोणावरही आरोप करण्यापूर्वी मला त्यासंदर्भात थोडी अधिक माहिती घेऊ द्या, त्यानंतर मी यावर नक्की बोलेन. मला वाटलं की यामागे कोणाचे तरी अदृष्य हात आहेत तर, मग मी त्याचा पडदा टराटरा फाडल्याशिवाय रहणार नाही, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -