घरमहाराष्ट्र...तर महाराष्ट्राचा युपी, बिहार होईल; राज ठाकरेंनी व्यक्त केली भीती

…तर महाराष्ट्राचा युपी, बिहार होईल; राज ठाकरेंनी व्यक्त केली भीती

Subscribe

1999 साली जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हापासून दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं हे महाराष्ट्रात सुरू झाले आणि याचा धोका असा आहे की, महाराष्ट्राचं उत्तर प्रदेश आणि बिहार होईल, असं म्हणत राज ठाकरेंनी भीती व्यक्त केली.

ठाणे: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ठाणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. राज ठाकरे यांनी अमित शहांसह भाजपवर टीका केली. इतकंच नाही तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही धारेवर धरलं. राज ठाकरे यांनी यावेळी, महाराष्ट्राचा युपी, बिहार होईल अशी भीती व्यक्त केली. (Maharashtra Politics Maharashtra will become UP Bihar Raj Thackeray expressed fear)

राज्यात जातीयवाद उफाळून येतोय यावर बोलताना राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष केलं आहे. राज ठाकरे म्हणाले की, जात ही गोष्ट अनेकांना प्रिय असते. अनेकांना आवडते. त्यात खाद्य संस्कृतीचा तसंच अभिमान आपलेपणाचा विषय असतो. परंतु राज्यात जातीचं राजकारण सुरू झालं ते 1999 साली जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हापासून दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं हे महाराष्ट्रात सुरू झाले आणि याचा धोका असा आहे की, महाराष्ट्राचं उत्तर प्रदेश आणि बिहार होईल, असं म्हणत राज ठाकरेंनी भीती व्यक्त केली.

- Advertisement -

राजकारणी लोकांना निवडून यायचं आहे त्यांच्या या स्वार्थी राजकारणामुळे महाराष्ट्र खड्ड्यात जातोय, असं राज ठाकरेंनी यावेळी म्हटलं. या महाराष्ट्राचं उदाहरण देशात दिलं जातं. सगळ्याचं बाबतीत महाराष्ट्र अग्रेसर होता, आहे आणि राहिलंही पण महाराष्ट्राच्या या प्रतिमेची जी काही वाट लावली जात आहे, ते चुकीचं आहे. असं ठाकरे म्हणाले.

मी जात नाही माणूस बघतो

जातीपातीवर विचारलं असता राज ठाकरे म्हणाले की मी पक्षात कोणालाही घेताना जात पात पाहत नाही. माणूस त्या तोडीचा असला पाहिजे, त्याच्यात कौशल्य असलं पाहिजे. ते असंल की जात आडवी येत नाही. मी केवळ माणूस पाहतो, असं स्पष्ट वक्तव्य राज ठाकरे यांनी यावेळी केलं.

- Advertisement -

सत्ता कायम राहत नाही- राज ठाकरे

भाजपच्या आताच्या राजकारणावर राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. आताची भाजपची विचार करण्याची पद्धत निराळी आहे. ईडी, सीबीआय हे फार काळ टिकत नाही. मी आधीही म्हणालेलो आहे की, सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी आलेलं नाही.

(हेही वाचा: फटाके कधी फोडायचे हे पण कोर्ट सांगतं? राज ठाकरेंची टीका म्हणाले, आम्हाला हात-पाय…)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -