Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र अण्णांसारखं जरांगेंना गुंडाळता येणार नाही; राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

अण्णांसारखं जरांगेंना गुंडाळता येणार नाही; राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

Subscribe

ठाकरे गटाचे खासदार, संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला केला आहे. अण्णा हजारेंसारखं  जरांगे पाटील यांना गुंडाळता येणार नाही, असं राऊत म्हणाले आहे. यावेळी त्यांनी राज्यातील सरकारवरही टीकास्त्र डागलं आहे.

मागच्या काही दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चावर जालन्यात झालेल्या लाठीचार्जवरून राज्यात तणावाचं वातावरण आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मागच्या सहा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांची समजूत काढण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ आंदोलनस्थळी गेलं होतं. मात्र, जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. सरकारला त्यांची समजूत काढण्यात अपयश येतय. यावरूनच आता ठाकरे गटाचे खासदार, संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला केला आहे. अण्णा हजारेंसारखं  जरांगे पाटील यांना गुंडाळता येणार नाही, असं राऊत म्हणाले आहे. यावेळी त्यांनी राज्यातील सरकारवरही टीकास्त्र डागलं आहे. ( Maharashtra Politics Manoj Jarange s cannot be wrapped like Anna Hajare Sanjay Raut s attack on BJP )

जालन्यात झालेल्या लाठीचार्जवरून राऊत यांनी सरकारला घरकोंबड म्हटलं आहे. प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील म्हणून हे सरकार बाहेर येत नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केली. इतकचं नाही तर जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी आपला प्राण पणाला लावून लढत आहेत. याआधी अण्णा हजारे यांनी असं उपोषण केलं होतं. त्यावेळी गिरीश महाजनच गेले होते मध्यस्थी करायला त्यावेळी त्यांनी अण्णांना गुंडाळलं होतं मात्र आता जरांगे पाटील यांच्या बाबतीत तसं करता येणार नाही. ते गुंडाळलं जाणार व्यक्तीमत्व नाही, या एका साध्या माणसानं सरकारला वेठीस आणलं आहे. जे काही आहे ते सत्य आणि खरं बोला, समाजाला गंडवू नका, असं स्पष्ट वक्तव्य राऊतांनी केलं आहे.

ही तर हुकूमशाही 

- Advertisement -

किरीट सोमय्या व्हायरल अश्लिल व्हिडीओ प्रकरणावरही यावेळी राऊतांनी भाष्य केलं. यावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाला त्याची चौकशी करायची सोडून, ज्येष्ठ पत्राकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व माध्यमांनी यासंदर्भात बातम्या दाखवल्या होत्या. मात्र केवळ काही ज्येष्ठ पत्रकारांवरच गुन्हा दाखल केला जातो हे टार्गेट किलिंग आहे. प्रत्येक लढवय्या नागरिकानं याविरोधात लढावं, असंही राऊत यांनी म्हटलं आहे. ही हुकूमशाही आहे, सत्य सांगणं हा जर का गुन्हा झाला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचा हा अपमान असल्याचं ते म्हणाले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -