घरमहाराष्ट्रMaharashtra Politics : मनसेच्या 'या' नेत्यांनी घेतली फडणवीसांची भेट, युतीच्या चर्चांना उधाण

Maharashtra Politics : मनसेच्या ‘या’ नेत्यांनी घेतली फडणवीसांची भेट, युतीच्या चर्चांना उधाण

Subscribe

भाजपा आणि मनसेमध्ये आगामी निवडणुकांच्यादृष्टीने चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मनसेच्या तीन नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

मुंबई : निवडणूक आयोगाने काल मंगळवारी (ता. 06 फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवारांना दिले आहे. ज्यामुळे विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेमुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसलेला असताना दुसरीकडे मात्र भाजपा आणि मनसेमध्ये आगामी निवडणुकांच्यादृष्टीने चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मनसेच्या तीन नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यामुळे या दोन्ही पक्षातील युतीच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. (Maharashtra Politics : MNS three leaders meet Deputy CM Devendra Fadnavis BJP MNS Yuti)

हेही वाचा… Raj Thackeray : राज ठाकरेंनी स्वत:चा पक्ष उभा केला, मनसेने अजित पवारांना सुनावले

- Advertisement -

भाजपा आणि मनसेची युती होणार, अशी चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, मध्यंतरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘एकला चलो रे’चा नारा दिल्याने या चर्चांना काही वेळेसाठी पूर्णविराम मिळाला होता. परंतु, आता पुन्हा मनसे आणि भाजपा नेत्याची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात मनसे-भाजपा युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गुप्त बैठक झाल्याचे सांगण्यात आले आहे. ही भेट नेमकी कशासाठी घेण्यात आली, हे अद्यापही समोर आलेले नाही. पण आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही गुप्त बैठक झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. तर ही एक सदिच्छा भेट होती, असे मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

एका वृत्तवाहिनीला संदीप देशपांडे यांनी या भेटीच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देत म्हटले की, आमची विशेष अशी काही चर्चा झाली नाही. बऱ्याच दिवसांपासून देवेंद्र फडणवीसांना भेटायचे होते. त्या दृष्टीने आम्ही तिघांनी त्यांची भेट घेतली. त्यामुळे ती एक फक्त सदिच्छा भेट होती. तर, यापुढेही प्रसंग आल्यास अशा सदिच्छा भेट नक्कीच होतील. आपण एखाद्या व्यक्तीला भेटलो, तर प्रत्येक वेळी त्याचा काहीतरी अर्थ काढला पाहिजे असे नाही. एकमेकांना भेटणे महाराष्ट्राचा इतिहास आहे. देवेंद्र फडणवीस हे देखील राज ठाकरे यांना येऊन भेटतात. त्यामुळे आम्ही देखील त्यांना भेटलो, असे देशपांडे यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -