Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी सद्याची राजकीय परिस्थिती म्हणजे जनतेचा पोपट - रोहित पवार

सद्याची राजकीय परिस्थिती म्हणजे जनतेचा पोपट – रोहित पवार

Subscribe

राज्यात रंगलेल्या पोपटाच्या राजकारणावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटवर आपले मत शेअर केले आहे. या ट्वीटमध्ये रोहित पवारांनी नाव न घेता राज्यातील शिंदे-फडणवीसांवर निशाणा साधला. त्यामुळे आता राज्यात नव्या वादाची शक्यता आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात ‘पोपटा’वरून राजकारण रंगले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पोपट मेलाय’ असे वक्तव्य करत ठाकरे गटावर निशाणा साधला होता. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी ‘पोपट अजून जिवंत आहे’ असे म्हणत फडणवीसांना प्रत्युत्तर दिले होते. अशातच आता या वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उडी मारली आहे. सध्याची राजकीय परिस्थिती म्हणजे जनतेचा पोपट झाल्याचे रोहित पवार यांनी म्हटले.

राज्यात रंगलेल्या पोपटाच्या राजकारणावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटवर आपले मत शेअर केले आहे. या ट्वीटमध्ये रोहित पवारांनी नाव न घेता राज्यातील शिंदे-फडणवीसांवर निशाणा साधला. त्यामुळे आता राज्यात नव्या वादाची शक्यता आहे. (Maharashtra Politics NCP MLA Rohit Pawar Tweet On Parrot)

- Advertisement -

नेमके काय म्हणाले रोहित पवार?

“राजकीय वक्तव्ये करताना दोन्ही बाजूंनी पोपट मेल्याची वक्तव्ये करण्यात येत आहेत. कोणाचा #पोपट_मेला हे निश्चितपणे सांगता येणार नाही. परंतु महाराष्ट्राच्या विकासाचा, युवकांच्या भविष्याचा, सर्वसामान्यांच्या स्वप्नांचा, आशा-आकांक्षांचा पोपट मेला हे मात्र निश्चितपणे खरं आहे”, असे रोहित पवार म्हणाले.

- Advertisement -

“कुणावर टीका करायची नाही पण सद्याची राजकीय परिस्थिती बघता जनतेला पोपट बनवलं जात असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये दृढ होत आहे, हे मात्र नक्की”, असा टोलाही रोहित पवारांनी लगावला.

सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर शिंदे-फडणवीस सरकार आणि ठाकरे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने आपले सरकार संवैधानिक असल्यावर शिक्कामोर्तब केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तर, ठाकरे गटासह महाविकास आघाडीने हे सरकार बेकायदेशीर असल्याचा दावा करत आहे. त्यामुळे आतापर्यंत ‘खोके सरकार’ असलेले शिंदे-फडणवीस सरकार आता ठाकरे गटाच्या दृष्टीने ‘बेकायदेशीर सरकार’ झाले आहे. यात आता महत्त्वाचा मुद्दा आहे तो, 16 आमदारांच्या अपात्रतेचा! हे आमदार अपात्र ठरतील, असे ठाकरे गटाचे म्हणणे आहे.

दोनच दिवसांपूर्वी यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘पोपटा’चा संदर्भ दिला. 16 आमदार अपात्र ठरतील की नाही, यावर मी भाष्य करणार नाही. हा विषय विधानसभा अध्यक्षांकडे आहे. पण पोपट मेला आहे. तो मान हलवत नाही. हात-पाय हलवत नाही, हे मविआला माहिती आहे. तथापि, त्यांनाही त्यांच्या लोकांना काही तरी सांगावे लागते. त्यामुळे ते अजूनही आशेवर आहेत, अशी टिप्पणी फडणवीस यांनी केली होती.


हेही वाचा – पोपट मेलाय की जिवंत? हे माहीत नाही; पण ‘शिंदे आनंद’ घेतायत…

- Advertisment -