घरमहाराष्ट्रKhichdi Scam : खिचडी घोटाळ्याचे लाभार्थी भाजपा आणि शिवसेनेत..., संजय राऊत यांचा...

Khichdi Scam : खिचडी घोटाळ्याचे लाभार्थी भाजपा आणि शिवसेनेत…, संजय राऊत यांचा आरोप

Subscribe

मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्यांमागे ईडी चौकशीचा ससेमिरा लागल्याचे चित्र दिसत आहे. ठाकरे गटाचे नेते आमदार रविंद्र वायकर यांची काल (ता.29 जानेवारी) ईडी चौकशी करण्यात आली. खिचडी घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते सुरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली. तर खिचडी घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाचे खासरदार संजय राऊत यांचे बंघु संदीप राऊत यांची आज (30 जानेवारी) ईडी चौकशी होणार आहे. ईडी चौकशींवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर, भाजपवर टीका केली आहे.

खिचडी घोटाळा जर झाला असेल तर त्यातले लाभार्थी हे ज्यांनी पालिकेकडून पैसे घेऊन खिचडी वाटप केले नाही, ते सगळे भाजप आणि शिंदे गटात आहेत. त्यामधील काही वर्षा बंगल्यावर आहेत. देवगिरी बंगल्यावर केटरिंग चालू आहे. सूरज चव्हाण यांना अटक केली मात्र त्यांना हात लावत नाही, असं ठाकरे गटाचे खासरदार संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा… Girish Mahajan : पार्टनर वाढले की खाती बदलतात; महाजनांनी फडणवीसांसमोरच व्यक्त केली खंत

खिचडी घोटाळा प्रकरणी अमये घोले, वैभव थोरात, राहुल कर्नाल यांनी कोट्यावधी रूपयांचा गैरव्यवहार महापालिकेत केला आहे. यांची नावे घेण्याची किरीट सोमय्या आणि ईडीची हिम्मत आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला. आमच्या पक्षातील लोकांना कितीकाळ त्रास द्याल. आमच्यापुढे लढवय्या बाण्याचा आदर्श आहे. तुमच्यासारख्या रणछोडदास नाही आहोत. आमचाही बॉस आहे पण तो सागर बंगल्यावर बसलेला नाही तर तो ईश्वर आहे, अस संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

महाराष्ट्रातून उद्योग पळून जात आहेत. राहुल कूल यांचा 500 कोटींचा मनी लॉन्ड्रिंग घोटाळा आहे. त्यावर सरकारने बोलावं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्यावर बोलावं. 8000 कोटींचा अम्बुलन्स घोटाळा झाला त्यावर बोलायला सरकारमध्ये हिंमत आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

हेही वाचा… Kishori Pednekar ED Enquiry : किशोरी पेडणेकरांसह संदीप राऊत यांची आज ईडी चौकशी

आगामी लोकसभा निवडणुकीत 400 हुन अधिक जागा जिंकू असा दावा भाजपने केला. यावर बोलतातान संजय राऊत म्हणाले की, 400 जागा सोडा तुम्ही 200 जागा तरी पार करण्याची तुमची औकात नाही आणि त्यामुळे तुम्ही बहुमताचा जुगाड करण्याचा प्रयत्न करत आहात. हे होणार नाही तुम्ही हरणार आहात, रामही तुम्हाला वाचवणार नाही असं संजय राऊत म्हणाले.

महाविकास आघाडीच्या जागावाटपा संदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीचा घटकपक्ष म्हणून चर्चेला बोलावले आहे. राजू शेट्टींशीही आमची चर्चा सुरू आहे. ते ज्या भागातून लढतायत ती जागा शिवसेनेची आहे, आम्ही यासंदर्भात चर्चा करू. महाराष्ट्रात जागावाटपामध्ये कोणतीही अडचण नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -