Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Politics : कोकणात ठाकरेंना मोठा धक्का, ज्येष्ठ नेते सूर्यकांत दळवींचा भाजपामध्ये...

Maharashtra Politics : कोकणात ठाकरेंना मोठा धक्का, ज्येष्ठ नेते सूर्यकांत दळवींचा भाजपामध्ये प्रवेश

Subscribe

मुंबई : आगामी लोकसभेसाच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी लोकसभेच्यादृष्टीने आजपासून (ता. 01 फेब्रुवारी) कोकण दौऱ्याला सुरुवात केली आहे. पण त्यांच्या या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी त्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण गेल्या 40 वर्षांपासून शिवसेनेसोबत असलेले सूर्यकांत दळवी यांनी ठाकरेंची साथ सोडत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. दळवी यांनी तब्बल 25 वर्ष दापोली-मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे दळवींच्या या प्रवेशामुळे उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. (Maharashtra Politics : Senior leader of Thackeray group from Konkan Suryakant Dalvi joins BJP)

हेही वाचा… Uddhav Thackeray : कोकण दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी साधला विधानसभा अध्यक्षांवर निशाणा, म्हणाले…

- Advertisement -

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज भाजपाच्या प्रदेश कार्यालयात सूर्यकांत दळवी यांचा हा प्रवेश सोहळा पार पडला. दळवी यांच्यासोबतच विविध पदाधिकाऱ्यांनी देखील भाजपामध्ये प्रवेशाचा केला आहे. दळवी हे 1990 ते 2014 असे सलग पाच टर्म दापोलीचे आमदार होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय कदम यांनी त्यांचा पराभव केला होता. तर, 2019 साली शिवसेनेने दळवी यांच्याऐवजी योगेश कदम यांना संधी दिली होती. आता संजय कदम हे ठाकरे गटात असल्याने दळवी यांनी ठाकरेंना सोडून भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

तर, गेली 40 वर्षे मी शिवसेनेत होतो. आज भाजपामध्ये आलेलो आहे. पक्ष वाढीसाठी जसे आपण शिवसेनेसाठी काम केले तसे आता भाजपासाठी करू. 25 वर्षे आमदार असूनही उद्धव ठाकरे यांनी दुर्लक्ष केले. एका पराभवानंतर माझी अवस्था कचऱ्याच्या टोपलीसारखी केली, अशी नाराजी व्यक्त करत सूर्यकांत दळवी यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याचे म्हटले आहे. तर लवकरच दापोलीत भव्य मेळावा घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. तर अनेक पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी भाजपामध्ये प्रवेश करीत आहेत. सूर्यकांत दळवी यांच्या प्रवेशाने कोकणात भाजपाला मोठे बळ मिळणार असून कोकणातील विकासाचे प्रश्न त्वरित मार्गी लावण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे या पक्षप्रवेशावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -