पवारांचा राजीनामा : राहुल गांधी, स्ट‌‌‌‌‌ॅलिन यांचे सुप्रिया सुळेंना फोन; मनधरणीचा प्रयत्न?

काँग्रेसचे नेते राहुल गांधी , द्रमुकचे नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्ट‌‌ॅलिन यांनी शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.

Maharashtra Politics Sharad Pawar s resignation Congress leader Rahul Gandhi M K Stalin call Supriya Sule
काँग्रेसचे नेते राहुल गांधी , द्रमुकचे नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्ट‌‌ॅलिन यांनी शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याची घोषणा केल्यापासून एकच खळबळ उडाली आहे. राज्यासह देशातील राजकारणात या निवृत्तीची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते निर्णय परत घेण्याची मागणी करत आहेत. आता याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी , द्रमुकचे नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्ट‌‌ॅलिन यांनी शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. ( Maharashtra Politics Sharad Pawar s resignation Congress leader Rahul Gandhi M K Stalin call Supriya Sule  )

शरद पवार यांनी राजीनामा का दिला? या संदर्भात राहुल गांधी आणि एम के स्टॅलिन यांनी सुप्रिया सुळेंना फोन केल्याचं बोललं जात आहे. तसचं, शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, असंही या नेत्यांनी फोनवर म्हटल्याचं सांगितलं जात आहे.

राहुल गांधी सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पूर्णवेळ कर्नाटकमध्ये आहेत. काही दिवसापूर्वीच त्यांची शरद पवार यांच्याशी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी भेट झाली होती. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा करताच राहुल गांधींनी सुप्रिया सुळेंना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे तामिळनाडूचे मुख्यमंक्षी आणि द्रमुक नेते एम.के. स्टॅलिन यांनीदेखील सुप्रिया सुळे यांच्यासोबत फोनवर चर्चा केली आहे.

फोनवरील चर्चेत काय घडलं?

राहुल गांधी आणि एम. के. स्टॅलिन यांनी सुप्रिया सुळे यांना फोन करुन चर्चा केल्याची माहिती आहे. शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर फोनवरुन चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी शरद पवार यांनी राजीनामा का दिला याबाबत माहिती घेतली. शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी भूमिका या नेत्यांनी घेतली आहे.

( हेही वाचा: ‘शरद पवारांनंतर आता मल्लिकार्जुन खर्गेंनी काँग्रेस…’ आशिष देशमुखांचा मिश्किल सल्ला )

शरद पवारांचा कार्यकर्त्यांशी संवाद

राजीनामा देण्याआधी मी तुमच्याशी चर्चा केली असती, तर मला खात्री होती की तुम्ही राजीनामा देऊ दिला नसता. हा जो निर्णय घेतला आहे, त्यावर राज्याबाहेरील लोकांबरोबर उद्या बैठक होईल, त्यानंतर एक ते दोन दिवसांत अंतिम निर्णय सांगू. दोन दिवसांनंतर तुम्हाला असं बसावं लागणार नाही, असं सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.