घरमहाराष्ट्रPolitics : जागांच्या फॉर्म्युल्यावर शिंदेंचा खासदार आक्रमक; म्हणतो, आम्ही भाजपच्या दावणीला...

Politics : जागांच्या फॉर्म्युल्यावर शिंदेंचा खासदार आक्रमक; म्हणतो, आम्ही भाजपच्या दावणीला…

Subscribe

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. जागांपाटपासंदर्भात बैठकाही सुरु आहेत. परंतु आता महायुतीत बिघाडी झाल्याचे समोर येत आहे. कारण महायुतीच्या नेत्यांनी चर्चा केल्यानंतर आता लोकसभा जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला आहे. यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 12 जागा मिळणार असल्याचे समजते. मात्र हा फॉर्मुला आम्हाला मान्य नसल्याचे शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी म्हटले आहे. तसेच भाजपावर निशाणा साधताना त्यांनी म्हटले की, आम्ही भाजपाच्या दावणीला बांधलेलो नाही. (Maharashtra Politics Shindes MP aggressive on seat formula Says we are not tied to BJPs claim)

हेही वाचा – Politics : युगेंद्र असो वा जोगेंद्र, निवडणुकीपूर्वी महाभूकंप होईल; मिटकरींचा दावा

- Advertisement -

महायुतीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी 32-12-4  या सूत्रानुसार जागावाटप होण्याची शक्यता आहे. भाजपाच्या वाट्याला सर्वाधिक 32 जागा येतील. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 12 आणि काही महिन्यांपूर्वीच महायुतीत सामील झालेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला फक्त 4 जागा मिळणार असल्याचे समजते. यासंदर्भात शिवसेनेचे खासादर गजानन किर्तीकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जागांच्या फॉर्मुलावर संताप व्यक्त करताना गजानन किर्तीकर म्हणाले की, महायुतीचा फॉर्म्युला कुठून आला हे मला माहित नाही. आमच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. मात्र आम्हाला 12 जागांचा हा फॉर्म्युला मान्य नाही. 2019 ला आम्ही 22 जागा लढलो होतो, त्यात आम्ही फक्त 4 जागा हरलो. त्यामुळे आता 12 जागा कशा घेणार? असा सवाल गजानन किर्तीकर यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा – Maharashtra Politics : भाजपा नेते आशिष देशमुखांचा विरोधी पक्षनेत्यांबाबत मोठा दावा, म्हणाले…

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपा आणि शिवसेनेने आपल्या खात्यातल्या जागा द्याव्यात, अशी चर्चा समोर येत या प्रश्नावर बोलताना गजानन किर्तीकर म्हणाले की, आम्ही भाजपाच्या दावणीला बांधलेलो नाही. आम्ही जास्त जागा लढवण्यावर ठाम आहोत, असेही गजानन किर्तीकर यांनी स्पष्ट केले. मात्र दुसरीकडे शिवसेनेचे सध्याचे विद्यमान खासदार आणि गेल्या निवडणुकीत लढवलेल्या मतदारसंघावर भाजपाच्या नेत्यांनी दावा ठोकला आहे. शिवसेनेच्या 18 खासांदारांपैकी 13 खासदार शिंदेंसोबत आहेत. असे असले तरी यातील काही मतदारसंघामध्ये भाजपने तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने महायुतीत जागा वाटप कसे होणार हे पाहावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -