Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र नसबंदी झाल्यावर मुलं होत नाहीत, पण संजय राऊत असा एक चमत्कार...; शिवसेनेची...

नसबंदी झाल्यावर मुलं होत नाहीत, पण संजय राऊत असा एक चमत्कार…; शिवसेनेची टीका

Subscribe

संजय राऊत म्हणजे राजकारणातला प्रेम चोपडा आहेत. त्यांना काही ना काही बडबड करुन, कोणाला नांदू द्यायचं नाही असं असतं. त्यांनी आम्हाला जो खुराडा म्हटलं, ते रमजानमध्य़े शीर कुरमा जास्त खाल्यामुळे. त्यांच्यावर कापायचा प्रभाव जास्त झालेला आहे, अशा शब्दांत शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी टीका केली.

ठाकरे गटाने नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिवसेना ( शिंदे गट) यांचा भाजपने पाळलेला कोंबड्यांचा खुराडा असा उल्लेख केला. त्यानंतर आता शिंदे गटाचे नेते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी जहरी टीका केली आहे. ( Maharashtra Politics Shivsena leader Sanjay Shirsat Criticised Sanjay Raut )

संजय राऊत म्हणजे राजकारणातला प्रेम चोपडा आहेत. त्यांना काही ना काही बडबड करुन, कोणाला नांदू द्यायचं नाही असं असतं. त्यांनी आम्हाला जो खुराडा म्हटलं, ते रमजानमध्य़े शीर कुरमा जास्त खाल्यामुळे. त्यांच्यावर कापायचा प्रभाव जास्त झालेला आहे, अशा शब्दांत शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी टीका केली.

संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?

- Advertisement -

संजय राऊत हा राजकारणातला प्रेम चोपडा आहे. त्याला रोज काही ना काही बडबड करुन कोणालाही नांदू द्याचं नाही असा त्याचा चंग असतो. खरंतर त्याने आज जे स्टेटमेंट केलंय आम्हाला कोंबड्यांचा खुराडा वगैरे जे म्हणाला आहे. त्याने रमजानमध्ये शीरखुर्मा जास्त खाल्ल्याने त्याच्यावर कापायचा प्रभाव पडला आहे. ज्याची नसबंदी झालेली असती त्याला मुलं होत नाही म्हणतात. पण संजय राऊत हा असा चमत्कार आहे जो नसबंदी झाल्यावरही आम्हाला मुलं होतील, असं सांगतो आहे. 18 खासदारांपैकी 13 खासदार निघून गेले आहेत. पाच खासदार राहिले आहेत तरीही दावा 19 खासदार निवडून येतील हा दावा करणं हा मूर्खपणा संजय राऊत करतो आहे. त्यामुळेच हा पक्षही लयास गेला आहे.

( हेही वाचा: ‘शिंदेंनी लोकसभेच्या 5 जागा लढवल्या तरी खूप झालं’; राऊतांची खोचक टीका )

राऊत काय म्हणाले होते?

- Advertisement -

कोण शिंदे-मिंधे गट? मी पक्ष म्हणून त्यांच्याकडे बघत नाही. तो गट म्हणजे भाजपने पाळलेला कोंबड्यांचा खुराडा आहे. गावाला कोंबड्यांचे खुराडे असतात तसं आहे. कधीही कोंबड्या कापल्या जातील. बोलायला सकाळ, संध्याकाळ कोंबड्या- कोंबडे आरवत असतात तसं ते करत आहेत. या कोंबड्या सध्या फडफड करत आहेत. त्यांच्या मानेवर कधीही सुरी फिरवली जाईल. पक्ष म्हणून त्यांच्याकडे काय विचारधारा आहे? काय बैठक आहे? निवडणूक आयोगाने एक निर्णय विकत दिला म्हणून पक्ष होत नाही. शिंदे गटाने 48 जागा लढवाव्यात. आम्हाला काही फरक पडत नाही, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

- Advertisment -