घरताज्या घडामोडीकोकणात रंगला सामना; निलेश राणेंनी निवडणुकीत उभे राहण्याचे वैभव नाईकांचे आव्हान

कोकणात रंगला सामना; निलेश राणेंनी निवडणुकीत उभे राहण्याचे वैभव नाईकांचे आव्हान

Subscribe

राज्यात नव्याने सरकार स्थापन झाल्यापासून ठाकरे गट आणि भाजपाचे आमदार एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत. अशातच कोकणात ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आणि भाजपा नेते निलेश राणे यांच्यातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यात नव्याने सरकार स्थापन झाल्यापासून ठाकरे गट आणि भाजपाचे आमदार एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत. अशातच कोकणात ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आणि भाजपा नेते निलेश राणे यांच्यातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. वैभव नाईकांनी थेट निलेश राणे यांना लोकशाहीच्या मार्गाने निवडणुकीत उभे राहण्याचे आव्हान दिले आहे. तसेच, वैभव नाईक यांनी राणे पिता-पुत्रांवर जोरदार टीका केली आहे. (maharashtra politics shivsena thackeray mla vaibhav naik challenge bjp leader nilesh rane)

“निलेश राणेंनी लोकशाहीच्या मार्गाने निवडणुकीत उभं राहून दाखवावे, असे आव्हान नाईक यांनी दिले. नारायण राणेंचा 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव केला. आता विधानसभेच्या निवडणुकीत निलेश राणेनी उभं राहून दाखवावे त्यांना आस्मान दाखवणार असल्याचे नाईक यांनी सांगितले. निलेश राणे मात्र निवडणुकीत उभं राहण्याचं धाडसही करणार नाहीत आणि भाजपही त्यांना तिकिट देणार नाही”, असे वक्तव्य नाईक यांनी केले. तसेच, “निलेश राणे आणि नारायण राणे यांनी दबावाखाली येऊन किती पक्ष बदलले. आम्ही मात्र कुणाचे मिंदे नसल्याने लोकांसमोर ठामपणे जात आहोत. कालच्या व्यासपीठावर असलेले लोक ही लोकांमधून निवडून आलेले नाहीत त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही”, असेही नाईक यांनी म्हटले.

- Advertisement -

याशिवाय, “भाजपने संविधान समर्थन रॅली काढून संविधानाच्या विरोधात भूमिका घेतली. भाजप सोबत येत नाहीत त्याना जेलमध्ये टाकू असे भाषणात म्हणत होते. भाजपच्या संविधान समर्थन रॅलीत जे होते ते भाजपची सत्ता आल्यानंतर गेले होते. मला भाजपमध्ये येण्यासाठी दवाब तंत्र वापरत असलात तर मी त्याला भीक घालणार नाही. मी चौकशीला सामोरे जाईन. माझ्याकडे एक रुपया जरी बेहिशेबी आढळला तर मला फाशी द्या अस् जाहीर आव्हान देतोय”, असेही वैभव नाईक यांनी म्हटले.

“भास्कर जाधव आणि मी चुकीचे वागलो असल्यास अटक करा. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिलो म्हणून कारवाई करत असली तरी शिवसेनेसोबत राहणार”, असे वैभव नाईक यांनी म्हटले. ”देशात आणीबाणीची परिस्थिती आहे. वैभव नाईक यांना अटक करा अशी मागणी भाजप करत आहे. मला अटक करून भाजप दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. या सगळ्यामागे राणे आहेत हे आता जाहीर झालेलं आहे. या राणेंच्या दबावाला आधी भीक घातली नाही आणि यापुढेही भीक घालणार नाही” असेही नाईक यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – कोल्हापुरात ढगफुटीसदृश्य पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली; वाहतुकीचा खोळंबा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -