Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Politics : त्याच त्या नावावर खल का व्हावा? सुषमा अंधारेंचा फडणवीसांवर...

Maharashtra Politics : त्याच त्या नावावर खल का व्हावा? सुषमा अंधारेंचा फडणवीसांवर निशाणा

Subscribe

भाजपाला आतापर्यंतच्या सर्वाधिक 132 जागांचा आकडा गाठून देणारे देवेंद्र फडणवीस यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडावी, असा भाजपाच्या आमदारांचा आग्रह आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ट्वीट करत फडणवीस यांच्यावर शरसंघान केले आहे.

(Maharashtra Politics) मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळवून देणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, अशी चर्चा आहे. विशेषत: फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्यात यावे, अशी भूमिका काही भाजपा नेत्यांनी मांडली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. (Sushma Andhare targets Fadnavis regarding Chief Ministership)

लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रात 45 पारचा दिलेला नारा भाजपाला यशस्वी करून दाखवता आला नव्हता. 28 जागा लढवूनही भाजपाला केवळ 9 जागा जिंकण्यातच यश आले होते. या पराभवाची जबाबदारी स्वीकारून फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारीही दाखवली होती, परंतु हे अपयश पचवून पुन्हा कामाला लागलेले देवेंद्र फडणवीस यांनी विधासनभा निवडणुकीत कसर भरून काढली. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने पक्षाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Politics : शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने…, ठाकरे गटाला आश्चर्य

एकनाथ शिंदे यांनी भाजपा श्रेष्ठींकडे मुख्यमंत्रीपदावरील दावा कायम ठेवल्याचे सांगण्यात येते. मात्र मुख्यमंत्रिपद आपल्या पक्षाकडे राहावे, यावर भाजपा नेत्यांमध्ये एकमत आहे. त्यातही विरोधकांची कोंडी फोडून भाजपाला आतापर्यंतच्या सर्वाधिक 132 जागांचा आकडा गाठून देणारे देवेंद्र फडणवीस यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडावी, असा भाजपाच्या आमदारांचा आग्रह आहे. नागपुरात तर फडणवीसांचे मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्सदेखील लागले आहेत.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ट्वीट करत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तरी भाजपा एकनाथ शिंदे, अजित पवार यांना इतक्यात दुखावणार नाही असे दिसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवताना त्याच त्या नावावर खल का व्हावा? भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सुधीर मुनगंटीवार आणि पंकजा मुंडे या ओबीसी नेत्यांची कायमच उपेक्षा का व्हावी? असा खोचक प्रश्नही त्यांनी केला आहे. (Maharashtra Politics : Sushma Andhare targets Fadnavis regarding Chief Ministership)

हेही वाचा – Eknath Shinde : माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, मुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -