Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Politics : मविआचा पराभव करण्यासाठी... ठाकरे गटाचा भाजपावर थेट आरोप

Maharashtra Politics : मविआचा पराभव करण्यासाठी… ठाकरे गटाचा भाजपावर थेट आरोप

Subscribe

योगी यांनी हिंदूंना सांगितले, एकत्र येऊन भाजपाला मतदान करा, नाहीतर तुमच्या कत्तली होतील, हे भय योगी यांच्यासारख्या नेत्याने निर्माण केले आणि त्यावर ‘एक है तो सेफ है’सारखे शिखर मोदी यांनी चढवले, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

(Maharashtra Politics) मुंबई : ऑल इंडिया एकता फोरमचे अध्यक्ष सज्जाद नोमानीस हाताशी धरून भाजपाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत एक व्हिडीओ प्रसारित केला. तो पूर्णपणे खोटा आणि गैरसमज पसरवणारा होता. महाविकास आघाडीचा पराभव करण्यासाठी भाजपाला हे असे भंपक उपद्व्याप करावे लागले, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाने केली आहे. (Thackeray group accuses BJP regarding Nomani’s video)

भाजपाच्या या उपद्व्याचा स्पष्ट अर्थ असा की, भाजपाला विजयाची खात्री नव्हती, पण त्यांच्या या अशा खटपटी तसेच लटपटी चालू होत्या आणि त्या लटपटीत त्यांना शेवटी धर्माच्या कुबड्या घ्याव्या लागल्या. हे त्यांचे अपयश आहे, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखातून सुनावले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Politics : त्याच त्या नावावर खल का व्हावा? सुषमा अंधारेंचा फडणवीसांवर निशाणा

धर्म ही नशा आहे, अफूची गोळी आहे, असे कार्ल मार्क्सने सांगितले. त्या अफूचे वाटप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी 90 हजार बैठकांत केले. त्यात अफूच्या विविध पुड्या आणि चूर्णाचे वाटप केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशातून आले आणि महाराष्ट्रासारख्या राज्यात अफूचे बी टाकून गेले. यात नुकसान झाले ते महाराष्ट्राचे, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

सन 2019 साली पुलवामा हत्याकांड घडले. त्यात चाळीस जवानांना प्राण गमवावे लागले. या हत्याकांडासही मोदी यांनी धार्मिक स्वरूप दिले, पण पुलवामामागचे खरे गुन्हेगार कोण? याचा शोध ते लावू शकले नाहीत. काश्मीरातील पंडितांची घरवापसी करू शकले नाहीत आणि पंडितांना आधार देण्यासाठी योगी महाराज काश्मीरात गेल्याचे दिसत नाही, पण महाराष्ट्रात अफूची खोकी घेऊन हे सर्व लोक आले आणि त्यांनी लोकांची डोकी बिघडवून टाकली, असा आरोप ठाकरे गटाने केला आहे.

योगी यांनी हिंदूंना सांगितले, एकत्र येऊन भाजपाला मतदान करा, नाहीतर तुमच्या कत्तली होतील, हे भय योगी यांच्यासारख्या नेत्याने निर्माण केले आणि त्यावर ‘एक है तो सेफ है’सारखे शिखर मोदी यांनी चढवले. महाराष्ट्रातील मतदारांना अशाप्रकारे भयभीत करण्याचा प्रकार घडला. झारखंडमध्येही हाच प्रयोग झाला. तेथे झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस पक्षाची युती होती. ही युती विजयी झाली. महाराष्ट्राच्या जनतेला ‘बटेंगे’चे असे कोणते भय वाटले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांवर 90 हजार बैठका घेण्याची वेळ का आली? हा संशोधनाचा विषय आहे, अशी खोचक टीका ठाकरे गटाने केली आहे. (Maharashtra Politics : Thackeray group accuses BJP regarding Nomani’s video)

हेही वाचा – Maharashtra Politics : ती परत आलीय, तोही परत येतोय…, मुख्यमंत्रिपदी फडणवीसांच्या निवडीची शक्यता


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -