अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावरून आता राजकारण तापताना दिसत आहे. एका शासकीय कर्मचाऱ्याच्या पगारावर खासगी क्षेत्रात तीन-तीन कर्मचारी काम करू शकतात, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यावर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थांनी संताप व्यक्त केला. तर आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांचं नाव न घेता, ट्वीट करत त्यांच्यावर टीका केली आहे. (Maharashtra Politics The changing role of a great leader Rohit Pawar criticizes Ajit Pawar without naming him )
अजित पवार काय म्हणाले होते?
उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूरला जात असताना डेमोक्रेटिक पक्षाच्या शिष्टमंडळाने शासकीय नोकरभरती खासगी कंपनीऐवजी शासनामार्फत करण्याची मागणी करणारं निवदेन दिलं. यावेळी, चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजित होते, यावेळी ते म्हणाले की शासकीय नोकरांचे पगार, भत्ते, महागाई वाढत आहे. यामुळे जर सर्वच ठिकाणी शासकीय कर्मचारी नियुक्त केले तर तुम्ही मुख्यमंत्री झालात तरी राज्याचा महसूल केवळ पगारावर खर्च होईल. मग रस्ते व अन्य कामासाठी निधी कुठला येणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
रोहित पवारांचं ट्वीट काय?
एका सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात तीन कंत्राटी कर्मचारी काम करतील या आशयाचे एका बड्या नेत्याचे वक्तव्य ऐकून व बदलती भूमिका बघून आश्चर्य वाटले. याच दृष्टीने विचार केला तर एका आमदारावर, खासदारावर होणाऱ्या करोडो रुपयांच्या शासकीय खर्चात हजारो कर्मचारी काम करतील.
बंडखोर आमदारांच्या सुरक्षेवर 150 कोटी खर्चासाठी, शासन आपल्या दारीच्या एकेका सभेसाठी 8-10 कोटी व त्याच्या जाहिरातीवर 52 कोटी, सरकारने गेल्या वर्षी केलेल्या कामांची यावर्षी जाहिरात करण्यासाठी शेकडो कोटी खर्च करताना काटकसर करावी, असा विचार शासन कधी करत नाही. शासकीय खर्चाची उधळमाप शासनाला चालते. मग नोकर भरतीसाठीच शासन एवढा बारीक विचार का करते? असं म्हणत त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा फीच्या माध्यमातून हजारो कोटींची वसुली करूनही पारदर्शक परीक्षा न घेऊ शकलेले सरकार प्रायव्हेट कंपन्यांना फायदा देण्यासाठी आज कंत्राटी भरतीसाठी जीआर काढत आहेत. केंद्र सरकारप्रमाणे कंत्राटी भरतीचे गुणगान गात आहे. सरकारला कंत्राटी भरतीची एवढीच हौस असेल तर राज्य सरकारच कंपनीला कंत्राटी पद्धतीने चालवायला द्या, असं म्हणत रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला.
एका सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात तीन #कंत्राटी_कर्मचारी काम करतील या आशयाचे एका बड्या नेत्याचे वक्तव्य ऐकूण व बदलती भूमिका बघून आश्चर्य वाटले. याच दृष्टीने विचार केला तर एका आमदारावर, खासदारावर होणाऱ्या करोडो रुपयांच्या शासकीय खर्चात हजारो कर्मचारी काम करतील.
बंडखोर आमदारांच्या…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 12, 2023
(हेही वाचा: मुख्यमंत्र्यांसह, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना घरी बसवा; अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यानं विद्यार्थ्यांमध्ये संताप )