घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रात सुरू असलेल्या दंगली हा भाजपचा लोकसभेचा प्लॅन; खैरेंचा गंभीर आरोप

महाराष्ट्रात सुरू असलेल्या दंगली हा भाजपचा लोकसभेचा प्लॅन; खैरेंचा गंभीर आरोप

Subscribe

अकोल्यातील हरीहर पेठ भागात शनिवारी रात्री उसळलेल्या दंगलसदृश्य परिस्थितीनंतर त्या भागात संचार बंदी लावण्यात आली आहे. तर काल, अहमदनगरमधील शेवगावातही दगडफेक करण्यात आली. त्यातच आता या सर्व प्रकरणावर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्रात सुरु असलेल्या दंगली या भाजपचा लोकसभा निवडणुकीचा प्लॅन आहे, असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

अकोल्यातील हरीहर पेठ भागात शनिवारी रात्री उसळलेल्या दंगलसदृश्य परिस्थितीनंतर त्या भागात संचार बंदी लावण्यात आली आहे. तर काल, अहमदनगरमधील शेवगावातही दगडफेक करण्यात आली. त्यातच आता या सर्व प्रकरणावर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्रात सुरु असलेल्या दंगली या भाजपचा लोकसभा निवडणुकीचा प्लॅन आहे, असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ( Maharashtra Politics The ongoing riots in Maharashtra are BJP’s Lok Sabha plan A serious charge against BJP by Chandrakant Khaire )

मुस्लिमांचं मत ठाकरेंच्या बाजूने किंवा महाविकास  आघाडीच्या बाजूने वळू नये, यासाठी हे सर्व सुरु असल्याचं खैरे म्हणाले. हिंदू- मुस्लिम यांना भडकवून भाजप राजकारण करत आहे. कर्नाटकात हनुमानाचं नाव घेऊनही भाजप तिथे फसलं. तुम्ही काय नाव घेता बजरंगबलीचं आम्ही तर त्याचे उपासक आहोत, म्हणून हनुमान आमच्यासोबत असल्याचं राऊत म्हणाले.

- Advertisement -

मुस्लिम समाज हा उद्धव ठाकरेंच्या आणि मविआच्या बाजूने आहेत त्यामुळे ही मतं वळवण्यासाठी भाजप या हिंदू- मुस्लिम दंगली घडवत आहे. इम्तियाज जलिल यांना औरंगाबादचं झालेलं नामांतराविरोधात 15 दिवस भाजपने उपोषणाला बसवलं आणि इकडे दंगली भडकवल्या, असं खैरे यावेळी म्हणाले.

( हेही वाचा: “‘मविआ’मध्ये उद्धव ठाकरेंची अवस्था दरबारातल्या सरदारासारखी”, नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला )

- Advertisement -

पाकळ्याचं गळून पडल्या

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर विरोधकांकडून भाजपवर टीकेची झोड सुरु आहे. ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी लोटस ऑपरेशवरुन भाजपला टोला लगावला आहे. ऑपरेशनल लोटसच्या पाकळ्याच गळून पडल्याचं ते यावेळी म्हणाले.  देशभरात भाजप लोटस ऑपरेशन करतं. पंरतु आता हे जे लोटस होतं त्याच्या पाकळ्याच गळून पडल्यात ते तुम्हाला वाचवता आलं नाही. कर्नाटकच्या जनतेने घेतलेला हा निर्णय भाजपला आत्मपरिक्षण करायला लावणारा आहे. भारतीय जनता पक्षाला प्रधानमंत्रीपासून गृहमंत्र्यांपर्यंत संपूर्ण यंत्रणा लावून सुद्धा 70 जागाही मिळवता आल्या नाही, असं म्हणत त्यांनी भाजपला सुनावलं. ज्या काँग्रेसला तुम्ही पप्पू म्हणत होते त्या काँग्रेसच्या पाठीमागे कर्नाटकची जनता उभी राहिली आणि संदेश दिल्याचं राऊत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -