घरमहाराष्ट्रMaharashtra Politics : घराणेशाहीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी अमित शहांना सुनावले, म्हणाले...

Maharashtra Politics : घराणेशाहीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी अमित शहांना सुनावले, म्हणाले…

Subscribe

घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन केलेल्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी प्रत्त्युतर देत जय शहा यांना बीसीसीआयचा अध्यक्ष का केले? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

मुंबई : लोकसभेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्याने राजकीय नेतेमंडळी आपापल्या विरोधकांवर जोरदार टीका करताना पाहायला मिळत आहे. घराणेशाहीचा मुद्दा हा नेतेमंडळीचा जिव्हाळ्याचा विषय असल्याने याच मुद्द्यावरून सर्वाधिक वाद पाहायला मिळतात. केंद्रीय मंत्री अमित शहा तर कायमच ठाकरे आणि पवार कुटुंबियांवर घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करत असतात. त्याचमुळे आता घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन केलेल्या टीकेला प्रत्त्युतर उद्धव ठाकरे यांनी जय शहा यांना बीसीसीआयचा अध्यक्ष का केले? असा प्रश्न उपस्थित केला आहे. (Maharashtra Politics : Uddhav Thackeray questioned Amit Shah on the issue of dynasticism)

हेही वाचा…Maharashtra Politics : “वयानुसार वैचारिक प्रगल्भता…”, अजित पवारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचा टोला

- Advertisement -

अमित शहा हे दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यामुळे या दौऱ्यावर असलेल्या अमित शहांनी माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावी, असे म्हणत ठाकरेंनी शहांवर निशाणा साधला आहे. काल एका जाहीर सभेत उद्धव ठाकरे म्हणाले की, अमित शहा तोंडवर करुन जेव्हा घराणेशाहीवर बोलतात की, उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री बनवायचे आहे?. होय, मला करायचे आहे मुलाला मुख्यमंत्री, पण ह्यांनी मते दिली तर तो मुख्यमंत्री होईल ना. कारण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद म्हणजे बीसीसीआयचे अध्यक्षपद नाही, असा टोलाच ठाकरेंनी लगावला आहे. अमित शहा महाराष्ट्रात येत आहेत, त्यामुळे त्यांनी उत्तर द्यावे, की जय शहाचे क्रिकेटमधील योगदान काय आहे?. जय शहा यांनी सचिन तेंडुलकरला शिकवले, विराट कोहलीला शिकवले की, आत्ताच्या यशस्वी जैस्वालला शिकवले? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे.

काय म्हणाले होते अमित शहा?

केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय नेते अमित शहा यांनी एका मुलाखतीदरम्यान काँग्रेसच्या घराणेशाहीवर भाष्य केले होते. त्यावेळी, त्यांनी इंडिया आघाडीच्या पक्षातील नेत्यांवरही जोरदार हल्लाबोल केला होता. त्यामध्ये, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंसह, लालूप्रसाद यादव, ममता बॅनर्जी, स्टॅलिन यांच्यावरही घराणेशाहीच्या मुद्द्यावरून निशाणा साधला होता. उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला म्हणजेच आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री बनवायचे आहे, असे अमित शहा यांच्याकडून सांगण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -