घरमहाराष्ट्रMaharashtra Politics : मविआच्या बैठकीत वंचितला अपमानास्पद वागणूक, प्रवक्ते पुंडकर संतापले

Maharashtra Politics : मविआच्या बैठकीत वंचितला अपमानास्पद वागणूक, प्रवक्ते पुंडकर संतापले

Subscribe

मविआच्या आजच्या मुंबईतील महत्त्वाच्या बैठकीत वंचितला अपमानास्पद वागणूक देण्यात आली आहे. वंचितचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक आज (ता. 30 जानेवारी) मुंबईतील ट्रायडेंड हॉटेलमध्ये पार पडली. या बैठकीमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे नेतेही सहभागी झाले होते. वंचित बहुजन आघाडीला ही या बैठकीला बोलविण्यात आले होते. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे बैठकीला उपस्थित राहिले नाही. परंतु, वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर हे या बैठकीला उपस्थित राहिले होते. मात्र, या बैठकीत वंचितला अपमानास्पद वागणूक देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीच्या या बैठकीत वंचितला तासाभरापेक्षा जास्त वेळ बाहेर बसवून ठेवण्यात आले. ज्यानंतर प्रदेशाध्यक्ष पुंडकर यांनी प्रसार माध्यमांसमोर येत याबाबतची नाराजी व्यक्त केली. (Maharashtra Politics : Vanchit Bahujan Aghadi disrespected in MVA meeting)

हेही वाचा… Vijay Wadettiwar : “आमच्या हक्काच्या संरक्षणासाठी ‘या’ तारखेला विराट सभा घेणार, कोणीही अंगावर येण्याचा विषय नाही”

- Advertisement -

महाविकास आघाडीच्या आजच्या या महत्त्वाच्या बैठकीला वंचितचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर उपस्थित होते. या बैठकीत पुंडकरांनी सुरुवातीला वंचितचा मुख्य धोरण महाविकास आघाडीसमोर सादर केले. परंतु, त्यानंतर त्यांना आम्ही चर्चा करून सांगतो, असे म्हणत साधारणतः तासाभरापेक्षा जास्त वेळ बैठकीच्या बाहेर बसवून ठेवण्यात आले. त्यामुळे मविआकडून देण्यात आलेल्या या वागणुकीमुळे नाराज झालेल्या प्रसार माध्यमांसमोर येत आपली भूमिका स्पष्ट केली. तर आम्ही महाविकास आघाडीचे घटकपक्ष आहोत की नाही? असा प्रश्न पुंडकर यांनी मविआच्या बैठकीत उपस्थित केला होता.

प्रसार माध्यमांसमोर वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणाले की, मनोज जरांगे पाटील आणि ओबीसींच्या आंदोलनाबाबत भूमिका घ्या, संदिग्ध राहू नका. तुमचा काही फॉर्म्युला ठरला असेल तर तो फॉर्म्युला आम्हाला सांगा. पण त्यांचे आपापसात काही ठरलेले नाही. त्यांचा आपापसात ताळमेळ नाही. त्यांचेच काही ठरलेले नसल्यामुळे त्यांनी आम्हाला काही सांगितलेले नाही. आम्ही सुरुवातीला एक-दीड तास बैठकीला बसलो. आम्ही त्यांना सांगितले की या-या विषयांवर तुम्ही भूमिका मांडा. तसेच महाविकास आघाडीमध्ये आधी आम्हाला घ्या. आम्हाला तसे पत्र द्या. त्यावर त्यांचे म्हणणे आहे की आम्ही विचार करतो. पण तेव्हापासून आम्ही बाहेर बसलो आहोत.

- Advertisement -

तर, आम्ही सीट मागितलेल्या नाहीत. त्यांच्याकडून फॉर्म्युला मागितला आहे. तुमचे पहिले ठरल्यानंतर आम्हाला सांगा. त्यानंतर आम्ही बोलू. आम्ही बैठकीच्या बाहेर असल्यामुळे त्यांना जातो असे सांगून आलेलो नाही. पण ही वागणूक योग्य नाही. त्यांच्याकडून अपमानास्पदच वागणूक मिळाली आहे म्हणून मी तुमच्यासमोर आलो आहे. आम्ही निर्णय घ्यायला सक्षम आहोत. आम्ही वर्षानुवर्षे रस्त्यावर भांडणारे लोकं आहोत. आम्हाला जागांशी काही घेणे देणे नाही, मात्र भाजपाला सत्तेतून बाहेर काढणे महत्त्वाचे आहे, असेही पुंडकर यांच्याकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले. परंतु, आता वंचितला मविआच्या बैठकीत अपमानास्पद वागणूक मिळाल्याने वंचितची साथ मिळण्याआधी मविआमध्ये बिघाडी होते का? असा प्रश्न आता या निमित्ताने निर्माण झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -