घरमहाराष्ट्रMaharashtra Politics : उनका भी हमें इंतजार; 'त्या' प्रश्नावर फडणवीसांचे सूचक वक्तव्य

Maharashtra Politics : उनका भी हमें इंतजार; ‘त्या’ प्रश्नावर फडणवीसांचे सूचक वक्तव्य

Subscribe

मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी (12 फेब्रुवारी) काँग्रेस सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी अशोक चव्हाण यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये पक्षप्रवेश केला आहे. यावेळी अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक अमर राजूरकर यांनीही आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यानंतर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस संजय निरुपम यांचे नाव न घेता आम्ही त्यांचीही वाट पाहत आहोत, असे म्हटले आहे. (Maharashtra Politics We are waiting for them too Question answerer Devendra Fadnavis suggestive statement)

हेही वाचा – Maharashtra Politics : अशोक चव्हाणांचा भाजपात प्रवेश; महायुतीला बळ मिळेल – देवेंद्र फडणवीस

- Advertisement -

अशोक चव्हाण यांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली असती तर ही परिस्थिती उद्भवली नसती, असे सूचक ट्वीट संजय निरुपम यांनी केले होते. याचपार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. यावर संजय निरुपम यांचे नाव न घेता ते म्हणाले की, तुम्ही उल्लेख केलेल्या व्यक्तीला मला अडचणीत आणायचे नाही, पण आम्ही त्यांचीही वाट पाहत आहोत. मात्र आमचा त्यांच्याशी संवाद नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी विनोदाने म्हटले आहे.

हेही वाचा – Jalgaon : पैशांच्या देवाणघेवाणीतून आधी राडा नंतर तुफान दगडफेक; परिसराला छावणीचं स्वरुप

- Advertisement -

नाना पटोले एका पदावर टीकू शकत नाही

अशोक चव्हाण भाजपामध्ये जाणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ट्वीट करत भाजपावर निशाणा साधला होता. याचपार्श्वभूमीवर पत्रकार परिषदते प्रश्न विचारण्यात आल्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नाना पटोले यांना आम्ही त्यांना प्रवेश दिला होता. ते आमच्याकडे राहिले, पण त्यांची सवय आहे, ते एका ठिकाणी टीकू शकत नाही. कुठल्या एका पदावर ते टीकू शकत नाही. त्यांना अध्यक्ष बनवलं तर ते सोडून गेले. त्यामुळे फार गंभीरतेने त्यांना घेऊ नका, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. 

संजय निरुपम काय म्हणाले होते?

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम ट्वीट करताना सूचक वक्तव्य केले होते. त्यांनी ट्वीट करताना म्हटले की, अशोक चव्हाण यांनी पक्षासाठी मोठं योगदान दिलं. कोणी त्याला उत्तरदायित्व म्हणत आहेत, कोणी ईडीला जबाबदार धरत आहेत, ही सर्व उतावीळ प्रतिक्रिया आहे. मुळात महाराष्ट्रातील एका नेत्याच्या कार्यशैलीवर ते खूप नाराज होते. याची माहिती त्यांनी वेळोवेळी वरिष्ठ नेतृत्वाला दिली होती. त्यांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली असती तर ही परिस्थिती उद्भवली नसती. संजय निरुपम यांच्या ट्वीटनंतर आता ते सुद्धा पक्षातून बाहेर पडणार का? अशीही चर्चा सुरू झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -