घरमहाराष्ट्रPolitics : युगेंद्र असो वा जोगेंद्र, निवडणुकीपूर्वी महाभूकंप होईल; मिटकरींचा दावा

Politics : युगेंद्र असो वा जोगेंद्र, निवडणुकीपूर्वी महाभूकंप होईल; मिटकरींचा दावा

Subscribe

बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटले आहे. बारामतीत ते शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचार करणार असल्याचे बोलले जात आहे. याचपार्श्वभूमीवर आता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, कुणी युगेंद्र अथवा जोगेंद्र आले तरी त्याला फार काही फरक पडणार नाही. कारण लोकसभा निवडणुकीपूर्वी महाभूकंप होईल. बरेच नेते, आमदार अजित पवारांच्या नेतृत्वात काम करताना दिसतील, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे. (Maharashtra Politics Whether Yugendra or Jogendra Earthquake will happen before elections Amol Mitkaris claim)

माध्यमांशी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, अनिल तटकरे, युगेंद्र पवार यांचे नाव मी पहिल्यांदाच ऐकले आहे. युगेंद्र पवार हे श्रीनिवास पवारांचे सुपुत्र आहेत हे मला नंतर कळाले. परंतु युगेंद्र पवारांची आम्हाला काही अडचण नाही. मात्र तिकडच्या गटातले बालमित्र मंडळाचे अध्यक्ष यांच्यााठी ही सावध घंटा आहे. कारण आपण आता अजित पवार होऊ असं ज्यांना वाटतंय त्यांना रोखण्यासाठी शरद पवारांनी युगेंद्र पवारांना पुढे आणलं आहे. त्यामुळे आता रोहित पवारांनी जास्त हवेत जाऊ नये. रोहित पवारांशिवाय तटकरे आणि पवार कुटुंबात वितुष्ट आणण्याचं काम मुंब्र्यातून चाललं आहे. याचा मास्टरमाईंड जितेंद्र आव्हाड आहे, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – Yugendra Pawar : आजोबा सांगतील तेच धोरण म्हणणारे युगेंद्र पवार आहेत कोण ? 

घरफोडी करणाऱ्यांपासून शरद पवारांनी सावध राहायला हवे, असा इशार देतानाच अमोल मिटकरी म्हणाले की, शरद पवारांना असे राजकारण आवडत नाही. पण लोकसभा निवडणुका डोळयासमोर ठेऊन बारामतीत सुनेत्रा पवारांना महायुती उमेदवारी देणार असेल तर त्यांच्याविरोधात सुप्रिया सुळे लढू द्या, कारण बारामतीकर सुज्ञ आहेत. रायगडमध्येही सुनील तटकरे आहेत. जनता योग्य उमेदवाराला निवडून देईल. सुनेत्रा पवार यांनी बारामतीत भरपूर काम केले आहे. त्यामुळे कुणी युगेंद्र अथवा जोगेंद्र आले तरी फार काही फरक पडणार नाही, असे अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 पेक्षा अधिक जागा दिसतील

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, राष्ट्रवादीचे 4 खासदार आधीपासून आहेत. त्यामुळे आमची मागणी 10 जागांची आहे. जर 10 जागा आम्हाला दिल्या तर निश्चित आमची ताकद आम्ही दाखवून देऊ. यासाठी लोकसभेत जास्तीत जास्त जागा मागून जिंकायच्या कशा यावर आमचा भर असणार आहे. लोकसभेत निश्चित यावेळी 4 पेक्षा अधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिसतील. महायुतीत जितक्या जागा आम्हाला मिळतील, त्या सर्व जागा आम्ही जिंकू, असा विश्वास अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – Maharashtra Politics : भाजपा नेते आशिष देशमुखांचा विरोधी पक्षनेत्यांबाबत मोठा दावा, म्हणाले…

लोकसभा निवडणुकीपूर्वी महाभूकंप होईल

अमोल मिटकरी यांनी दावा केला की, काँग्रेस आणि शरद पवार गटातील अनेक आमदार अजित पवारांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक पक्षप्रवेश दिसतील. काँग्रेसचे 7 आमदार आणि शरद पवार गटातील 5 आमदार अजित पवारांशी चर्चा करत आहेत, काल अजित पवारांच्या बंगल्यावरही शरद पवार गटातील एक महत्त्वाचा नेता भेटीला आला होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी महाभूकंप होईल. बरेच नेते, आमदार अजित पवारांच्या नेतृत्वात काम करताना दिसतील, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -