Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र लाठीकाठी घेऊन शासन आपल्या दारी का? मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय लाठीचार्ज नाहीच; आदित्य ठाकरेंचा...

लाठीकाठी घेऊन शासन आपल्या दारी का? मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय लाठीचार्ज नाहीच; आदित्य ठाकरेंचा घणाघात

Subscribe

महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्यांकडे जास्त लक्ष देण्यात काही अर्थ नाही. लाठीकाठी घेऊन शासन आपल्या दारी येऊन करायचं काय? असा सवाल आहे. लाठीकाठी घेऊन शासन नेमकं काम कोणासाठी करतं. सरकार बिल्डरसाठी काम करताना दिसत आहे. या जनतेसाठी नाही. तसंच, जालन्यात जो मराठा समाजावर लाठीचार्ज झाला तो मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय होऊच शकत नाही, असं म्हणत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.

महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्यांकडे जास्त लक्ष देण्यात काही अर्थ नाही. लाठीकाठी घेऊन शासन आपल्या दारी येऊन करायचं काय? असा सवाल आहे. लाठीकाठी घेऊन शासन नेमकं काम कोणासाठी करतं. सरकार बिल्डरसाठी काम करताना दिसत आहे. या जनतेसाठी नाही. तसंच, जालन्यात जो मराठा समाजावर लाठीचार्ज झाला तो मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय होऊच शकत नाही, असं म्हणत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. (Maharashtra Politics Why the government with a stick No baton charge without Chief Ministers permission Aditya Thackeray s attack)

आदित्य ठाकरे यांनी तीव्र शब्दांत सरकारचा निषेध केला आहे. आदित्य ठाकरेंनी म्हटलं की, मी दोन ते अडीच वर्ष मुख्यमंत्र्यांचं कार्यालय जवळून पाहिलं आहे. इतकी संवेदनशील घटना घडते आणि त्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना कल्पना नाही, असं होऊ शकत नाही. त्यांना माहिती नसल्याशिवाय पोलीस लाठीचार्ज करणार नाहीत. त्यामुळे या खोके सरकारला राजीनामा देण्याची गरज आहे. सरकारला थोडी जरी लाज उरली असेल तर सरकार राजीनामा देईल.

- Advertisement -

आदित्य ठाकरे यांनी यावेळी बोलताना बारसू आणि खारघरच्या घटनेचादेखील उल्लेख केला आहे. यावर बोलताना आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे की, बारसूमध्येही महिलांवर असाच लाठीचार्ज करण्यात आला. खारघरच्या घटनेची फक्त चौकशी करण्यात आली. आता जालन्यामध्ये मराठा समाजाच्या तरुणांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे आणि हे महाराष्ट्राचं दुर्दैवी आहे. शांततेत सर्व सुरू होतं मग एवढा लाठीचाोर्ज करण्याची गरज होती का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

आदित्या ठाकरे म्हणाले की, शेतकऱ्यांना सध्या मदतीची गरज आहे. पण आम्ही सरकारकडून अपेक्षा सोडल्या आहेत. प्रशासनाने त्यांचं काम केलं असेल, पंचनामे केले असतील. पण शेतकऱ्यांना सरकारकडून कोणतीही मदत झाली नाही. तसंही आता शेतकऱ्यांनाही सरकारकडून कोणतीही अपेक्षा राहिली नाही, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: अजितदादांच्या बारामतीत मराठा समाज रस्त्यावर; जालना घटनेच्या निषेधार्थ सरकारविरोधात घोषणाबाजी )

- Advertisment -