घरमहाराष्ट्रPolitics: माझा प्रचार धनंजय मुंडे करणार? पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य

Politics: माझा प्रचार धनंजय मुंडे करणार? पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य

Subscribe

बीड: बीडमध्ये भाजपाच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्या जागी आता भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. इतकचं नाही तर पंकजा मुंडे यांचा प्रचार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे करतील असं म्हटलं जात आहे. यावर पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी मीच भाजपाची स्टार प्रचारक असल्याचं म्हणत, धनंजय मुंडे माझा प्रचार करणार नाहीत, महायुतीत असल्यानं ते तिथे येऊ शकतात. परंतु, माझ्या जिल्ह्यातील उमेदवाराचा प्रचार मीच करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. (Maharashtra Politics Will Dhananjay Munde campaign for me Indicative statement by Pankaja Munde)

नेमंक काय म्हणाल्या पंकजा मुंडे? 

बीडमध्ये भाजपाच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्या जागी आता भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली जाणार आणि तुमचे स्टार प्रचारक धनंजय मुंडे असतील, असं म्हटलं जात असल्याचं पंकजा मुंडे यांना विचारण्यात आलं. यावर त्या म्हणाल्या की, बीड जिल्ह्यातून प्रीतम मुंडे या मागची 10 वर्षे खासदार आहेत. त्यांनी अतिशय उत्तम काम केलं आहे. राष्ट्रवादीसोबत युती झाल्याने निसर्गत: माझ्या मतदारसंघात प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

- Advertisement -

मी राज्याची नव्हे तर देशाची स्टार प्रचारक राहिलेली आहे. मी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान या सर्व ठिकाणी पक्षाचा प्रचार केलेला आहे. त्यामुळे माझ्या जिल्ह्यातील लोकसभेचा उमेदवार कोणीही असो, स्टार प्रचारक आणि सर्व जबाबदारी ही माझी असणार आहे, असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे.

माझ्या नावाची चर्चा कायमच 

लोकसभेसाठी प्रीतम मुंडे यांच्याऐवजी आता पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा होत असल्याचं पंकजा मुंडे यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी माझ्या नावाची चर्चा ही सतत, प्रत्येक निवडणुकीत होत असते. त्यामुळे तुम्ही त्याची सवय करून घ्या, असं पंकजा मुंडे यांनी पत्रकारांना म्हटलं आहे.

- Advertisement -

आम्ही विरोधात लढलो आहोत

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्या की, 2014 आणि 2019 ला मी आणि धनंजय मुंडे एकमेकांविरोधात लढलो आहोत. त्यामुळे आता भविष्यात आणखी काही अनुभव वाट्याला येतात का हे पाहावं लागणार असल्याचं मुंडे म्हणाले.

(हेही वाचा: Ambadas Danve : अंबादास दानवे विधान परिषदेत गरजले; अर्थसंकल्पावरून सरकारला घेरलं)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -