घरताज्या घडामोडी'सरकार स्थिर चालवायचंय तर काँग्रेस श्रेष्ठींवर बोलणं टाळा'

‘सरकार स्थिर चालवायचंय तर काँग्रेस श्रेष्ठींवर बोलणं टाळा’

Subscribe

'सरकार स्थिर चालवायचंय तर काँग्रेस श्रेष्ठींवर बोलणं टाळा', शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख न करत महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आणि महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी इशारा दिला आहे.

महाराष्ट्र राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील काँग्रेस हा मित्रपक्ष पुन्हा एकदा दुखावल्याचे समोर आले आहे. एका मराठी दैनिक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्या कार्यशैलीबद्दल भूमिका मांडली होती. यावरूनच काँग्रेस नाराज असल्याचं बोललं जात असतानाच काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना सूचक इशारा दिला आहे. ‘सरकार स्थिर चालवायचंय तर काँग्रेस श्रेष्ठींवर बोलणं टाळा’, शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख न करत त्यांनी हा इशारा दिला आहे. त्यावरुन पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.

काँग्रेसनं मौन सोडलं

महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील वाद आता समोर येऊ लागले आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधीविषयी करण्यात आलेल्या टीकेमुळे काँग्रेसनं मौन सोडत महाआघाडीतील नेत्यांना सूचक इशारा दिला आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आणि महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

काय म्हणाल्या यशोमती ठाकूर?

‘आघाडी मधील काही नेत्यांच्या काही मुलाखती/लेख माझ्या निदर्शनास आलेयत. काँग्रेसची कार्याध्यक्षा म्हणून मला आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते की हे सरकार स्थिर राहावं, असं वाटत असेल तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावं. आघाडी धर्माचं पालन सर्वांनी करावं. काँग्रेसचं नेतृत्व अतिशय स्थिर आहे, निर्णयक्षम आहे. राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे’.

- Advertisement -

हेही वाचा – भाजपास पुन्हा सुतक, ‘सामना’तून टीका


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -