Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra polls 2024 : निवडणुकांचे इतके व्यापारीकरण कधीच झाले नव्हते, ठाकरे गटाचा...

Maharashtra polls 2024 : निवडणुकांचे इतके व्यापारीकरण कधीच झाले नव्हते, ठाकरे गटाचा भाजपावर निशाणा

Subscribe

पैसा आणि रक्तपाताच्या मार्गावरून महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक चालली आहे. मुंबईत प्रचारादरम्यान एका माजी मंत्र्याची हत्या होते आणि मतदानाच्या आदल्या दिवशी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खुनी हल्ला घडवून त्यांना जिवे मारण्याचा डाव रचला जातो. महाराष्ट्रासारख्या राज्यात इतके खुनशी आणि दळभद्री प्रकार कधी घडले नव्हते, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

(Maharashtra polls 2024) मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाचे आणि निवडणुकांचे इतके व्यापारीकरण याआधी कधीच झाले नव्हते. आधी आमदार, खासदार विकत घेतले, आता मतदारसंघ विकत घेण्यासाठी खोक्यांचा पाऊस पाडला जात आहे. खुद्द भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावरच विरारमधील एका हॉटेलात पैसे वाटप केल्याचा आरोप झाला आहे. त्यावरून भाजपा आणि स्थानिक बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीदेखील झाली, असे सांगत ठाकरे गटाने भाजपावर निशाणा साधला आहे. (Thackeray group targets BJP over alleged distribution of money before Voting)

‘बविआ’च्या कार्यकर्त्यांनी तावडे यांना हॉटेलमध्येच अडकवून ठेवले होते. तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्येही मिंध्यांच्या उमेदवाराकडून पैसे वाटप केले जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बोटाला शाई लावून मतदान ओळखपत्र आणि आधार कार्ड ताब्यात घेऊन पैसे वाटप झाल्याचा प्रकारही तेथे घडल्याचा आरोप याआधी झालाच होता, याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना देनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून लक्ष वेधले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Vinod Tawde : पैशाचे सर्व आरोप खोटे, त्याबाबत एकही गुन्हा दाखल नाही; काय म्हणाले विनोद तावडे?

महाराष्ट्राच्या भविष्याचा निकाल ठरविणारी विधानसभा निवडणूक आज होत आहे. दोन दिवसांपूर्वी प्रचार संपला. म्हणजे तोफा थंडावल्या, तलवारी म्यान झाल्या असे म्हणायची पद्धत आहे, पण तलवारी म्यान झाल्या तरी पैशांच्या थैल्या आणि खोके उघडून मतदारांना विकत घेण्याच्या मोहिमा काही थांबलेल्या नाहीत, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

- Advertisement -

नाशिकमध्येही भाजपावाल्यांवर याच पद्धतीचे आरोप झाले आहेत. सत्तापक्षांकडून मतदानासाठी पैशांचा बाजारच मांडल्याचे हे चित्र भयंकर आणि महाराष्ट्राच्या आजवरच्या स्वच्छ राजकीय इतिहासाला कलंक फासणारे आहे. अशा वेळी महाराष्ट्र आपले इमान आणि स्वाभिमान राखणार की नाही हाच प्रश्न आहे, अशी भीती ठाकरे गटाने व्यक्त केली आहे.

हेही वाचा – Cash for Vote : तावडे प्रकरणावरुन राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना टोला; कोणी टेम्पोने पाच कोटी पाठवले?

पैसा आणि रक्तपाताच्या मार्गावरून महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक चालली आहे. मुंबईत प्रचारादरम्यान एका माजी मंत्र्याची हत्या होते आणि मतदानाच्या आदल्या दिवशी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खुनी हल्ला घडवून त्यांना जिवे मारण्याचा डाव रचला जातो. महाराष्ट्रासारख्या राज्यात इतके खुनशी आणि दळभद्री प्रकार कधी घडले नव्हते, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

आज या आपल्या महाराष्ट्राचे चित्र काय आहे? एखाद्या कोऱ्या कागदावर कोणीतरी पानाची पिचकारी मारावी त्याप्रमाणे महाराष्ट्राचा नकाशा विद्रूप झाला आहे. महाराष्ट्राचे समाजमन दुभंगले आहे. जाती-जातीत भांडणे लावून, धर्मा-धर्मात द्वेष पसरवून दिल्लीचा सुलतान आणि त्याचे महाराष्ट्रातील लाचार सरदार मजा पाहत आहेत, असा घणाघात ठाकरे गटाने केली आहे. (Maharashtra polls 2024 : Thackeray group targets BJP over alleged distribution of money before Voting)

हेही वाचा – Devendra Fadnavis : विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हटले…


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -