घरताज्या घडामोडीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा शनिवारी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा शनिवारी

Subscribe

५८ केंद्रांवर २२ हजार विद्यार्थी होणार प्रविष्ठ

राज्य लोकसेवा आयोगाची येत्या शनिवारी (दि.४) नाशिकला विविध केंद्रावर परीक्षा होणार आहे. त्यानंतर लागलीच पुढील आठवड्यात नाशिकला केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा होणार आहे. नाशिक केंद्राला मान्यता मिळाल्यानंतर प्रथमच पुढील आठवड्यात परीक्षा होणार आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० शनिवारी (दि.४) सकाळी ११ ते १२ या वेळेत जिल्ह्यातील विविध ५८ केंद्रावर घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी २२ हजार ५१५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले आहेत. राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेच्या तयारीसाठी यंत्रणेची दोन दिवसांपासून तयारी सुरु आहे. परीक्षार्थींनी केंद्रावर परीक्षेपूर्वी दीड तास अगोदर हजर राहणे अनिवार्य असून परीक्षा कक्षातील शेवटच्या प्रवेशासाठी प्रमाणपत्रावर विहित केलेल्या वेळानंतर कोणत्याही उमेदवारास प्रवेश देण्यात येणार नाही, असेही सूचित करण्यात आले आहे.

- Advertisement -

कोविडच्या पार्श्वभूमीवर विशेष सूचना
कोविडच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रावर विशेष दक्षता घेण्यात येणार आहे. ताप, खोकला, थंडी इत्यादी प्रकारची लक्षणे असलेल्या अथवा ३८ डिग्री सेल्सिअस अथवा १००.४ डिग्री फॅरेनहाईटपेक्षा जास्त तापमान असलेल्या उमेदवारांची बैठक व्यवस्था स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर परीक्षेकरीता नियुक्त सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच उमेदवार यांनी आरोग्यसेतू अ‍ॅप डाऊनलोड करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. परिक्षा केंद्रावर प्रवेशाच्या आधी प्रत्येक उमेदवाराची थर्मल गनद्वारे तापमान तपासणी घेण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -