MPSC Exam 2021: एमपीएससीने राज्य सेवा परीक्षेच्या १०० जागा वाढवल्या, नवे परिपत्रक जाहीर

maharashtra public service commission mpsc increased 100 post for state service exam publish revised advertisement for state service exam 2021
MPSC Exam 2021: एमपीएसीने राज्य सेवा परीक्षेच्या १०० जागा वाढवल्या, नवे परिपत्रक जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ ची जाहीरात प्रसिद्ध केली होती. यात राज्य सेवा परीक्षेअंतर्गत २९० रिक्त पदांसाठी १६ संवर्गात भरती केली जाणार होती. मात्र एमपीएससीकडून आता पदसंख्येत वाढ केली आहे. १०० पदं वाढल्यामुळे आता एमपीएससीकडून ३९० पदांसाठी २ जानेवारी २०२२ ला राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली जाणार आहे. पदसंख्या १०० ने वाढवल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

एमपीएससीने नवीन परिपत्रक काढत करत २० संवर्गात ३९० पदांची जाहीरात प्रसिद्ध केली आहे. यात क्लास 1 ( गट अ च्या ) 100 जागा वाढल्या आहेत. राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ ची जाहिरात आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही राज्य पूर्व परीक्षा २ जानेवारी,२०२२ रोजी होणार आहे तर मुख्य परीक्षा ७,८ आणि ९ मे २०२२ रोजी आयोजित करण्यात येईल.

2021 च्या राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी उमेदवार ५ ऑक्टोबर दुपारी २ वाजल्यापासून अर्ज दाखल करु शकतात. ही अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक २५ ऑक्टोबर आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क ५४४ तर मागासवर्गीय उमेदावारंसाठी ३४४ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.