घरमहाराष्ट्रपुणेसरकारी नोकऱ्यांच्या खासगीकरणाविरोधात आपचे पुण्यात 'थाळीनाद' आंदोलन

सरकारी नोकऱ्यांच्या खासगीकरणाविरोधात आपचे पुण्यात ‘थाळीनाद’ आंदोलन

Subscribe

ज्या नऊ कंपन्यांच्या माध्यमातून ही कामगार भरती केली जाणार आहे. त्यातील काही कंपन्याचा भाजप नेत्यांशी संबंधातील असल्याचा गौप्यस्फोट यावेळी आपच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

राज्य सरकार आणि सरकारी-निमसरकारी कर्मचारी यांच्यातला संघर्ष काही मिटण्याचं नाव घेत नाहीय. विविध स्तरावरील नोकरभरती खासगीकरणाच्या माध्यमातून केली जाणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात पुण्यात आप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. पुण्यातील स्वारगेट चौक इथे थाळी नाद आंदोलन करून हा सरकारी नौकरीमधील आरक्षण संपविण्याचा डाव असल्याचा आरोपही आपकडून करण्यात आला आहे.

मंत्रिमंडळाच्या ८ मार्च रोजी झालेल्या बैठकीत बाह्ययंत्रणेच्या माध्यमातून नोकर भरती धोरणास मान्यता देण्यात आली. त्यानुसार उद्योग-कामागार विभागाने मंगळवारी याबाबतचा शासन निर्णयही घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता कोणत्याही विभागाला नोकर भरती करताना सरकारने नेमलेल्या मनुष्यबळ पुरवठा एजन्सीकडूनच नोकरभरती करावी लागणार आहे. यावर आक्षेप घेत पुण्यातील आप पक्षाने थाळी नाद आंदोलन केलं. यावेळी पदाधिकाऱ्यांनी जोरदार थाळ्या वाजवत सरकारच्या या नव्या धोरणाचा निषेध व्यक्त केलाय.

- Advertisement -

ज्या नऊ कंपन्यांच्या माध्यमातून ही कामगार भरती केली जाणार आहे. त्यातील काही कंपन्याचा भाजप नेत्यांशी संबंधातील असल्याचा गौप्यस्फोट यावेळी आपच्या पदाधिकाऱ्यांनी केला. काही कंपन्यांचे संचालक सारखेच आहेत तर काही कंपन्यांच्या संचालकांवर महाआयटी घोटाळा केल्याचा आरोप आहे. काही संचालक हे दुबईला फरार असल्याचे आरोप आहेत. कामगारांच्या पगाराचा व पी एफचा ‘प्रसाद’ मिळवण्यासाठी या कंपन्यांचे ‘लाड’ बंद करा अशी मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली.

अ‍ॅक्सेंट टेक सर्व्हिसेस लि., सी.एम.एस. आयटी सव्‍‌र्हिसेस लि., सी.एन.सी ई-गव्‍‌र्हनन्स सर्व्हिसेस इंडिया लि., इनोवेव आयटी इन्फ्रास्ट्रक्चर लि., क्रिस्टल इंटग्रेटेड सर्व्हिसेस प्रा. लि., एस-2 इन्फोटेक इंटरनॅशनल लि., सैनिक इंटेलिजन्स सिक्युरिटी प्रा. लि., सिंग इंटेलिजन्स सिक्युरिटी प्रा. लि., उर्मिला इंटरनॅशनल सर्व्हिसेस या नऊ कंपन्यांमार्फत पुढील पाच वर्षांकरिता नोकरभरती होणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या अनेक कंपन्यांचे कामगारांना वेळेत पगार देण्याबद्दलचचे, पीएफ भरण्याबद्दलचे, पूर्ण पगार देण्याबद्दलचे ट्रॅक रेकॉर्ड हे वाईट असून शासनाकडून पूर्ण पगार घ्यायचा आणि कंत्राटी कामगारांना मात्र कमी पगार द्यायचा, त्यांचा पीएफ भरायचा नाही आणि बक्कळ पैसे कमवायचे असा हा गोरख धंदा आता राज्य शासनाच्या आशीर्वादाने केला जाणार आहे, असं देखील आपच्या वतीने सांगण्यात आलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -