घरताज्या घडामोडीपुणेकरांना दिलासा! निर्बंध शिथिल; आठवड्यातील सर्व दिवस दुकानं राहणार सुरू

पुणेकरांना दिलासा! निर्बंध शिथिल; आठवड्यातील सर्व दिवस दुकानं राहणार सुरू

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांच्या यांच्या उपस्थितीत पुण्यात बैठक पार पडली. या बैठकीत पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी पुण्यातल्या निर्बंधामध्ये मोठी शिथिलता देण्यात आली आहे. या निर्णयानुसार, पुण्यात सर्व दुकाने सर्व दिवशी सुरु राहणार आहे. तसेच हॉटेल आणि रेस्टॉरंट आठवड्यातील सर्व दिवस रात्री दहा वाजेपर्यंत सुरु राहतील असेही त्यांनी सांगितले. आठवड्याची कोरोना आढावा बैठक झाल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.

कोरोना आढावा बैठक घेतल्यानंतर अजित पवार यांनी असे सांगितले की, पुण्यात शनिवारी- रविवारी सर्व सेवांना दुपारी ४ पर्यंत परवानगी दिली जाणार असून पुण्यातील सर्व दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ वाजेपासून रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार तर हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु सुरु राहणार आहे, असे सांगून पुण्यातील निर्बंध शिथील करण्याबाबतची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

- Advertisement -

यासह पुण्यात मॉल्सही रात्री ८ पर्यंत सुरू राहणार असून कोरोना लशीचे दोनही डोस घेतलेल्यांना मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. शहरातील सर्व उद्याने नियमित वेळेनुसार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परवानगी असली तरी पुणेकरांना मास्क लावणे बंधनकारक असणार आहे, असेही यावेळी अजित पवार यांनी सांगितले. मॉल हॉटेल जलतरण तलाव यासाठी सुद्धा नवी नियमावली लागू केली जाणार आहे. पुणे ग्रामीण सुद्धा लेवल ३ वर आहे. निर्बंध शिथिल करण्यात येत असले तरी पॉझिटिव्हिटी रेट ७ टक्के झाल्यास कडक निर्बध लावणार असल्याची माहिती त्यांनी दिली.


 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -