Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रकोकणMaharashtra Rain : कोकण रेल्वे अनिश्चित काळासाठी ठप्प, 9 गाड्या रद्द तर...

Maharashtra Rain : कोकण रेल्वे अनिश्चित काळासाठी ठप्प, 9 गाड्या रद्द तर काहींचे मार्ग बदलले

Subscribe

कोकणात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती उद्भवली आहे. त्याचाच फटका कोकण रेल्वेलाही बसला आहे. या मार्गावरील मालपे (पेडणे-गोवा) या बोगद्यात पाणी तसेच चिखल भरल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेच्या पेडणे बोगाद्यामध्ये पुन्हा पाणी भरल्याने रात्री उशिरा सुरू करण्यात आलेली येथील रेल्वेवाहतूक बुधवारी पहाटे पुन्हा बंद करण्यात आली. यामुळे मुंबईहून रवाना होणाऱ्या काही ट्रेन्स रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असल्याची माहीती कोकण रेल्वेने दिली. (Maharashtra Rain : Konkan Railway halted indefinitely nine trains cancelled)

कोकणात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती उद्भवली आहे. त्याचाच फटका कोकण रेल्वेलाही बसला आहे. या मार्गावरील मालपे (पेडणे-गोवा) या बोगद्यात पाणी तसेच चिखल भरल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. गोव्याकडे जाणाऱ्या गाड्या सिंधुदुर्गातील काही स्थानकांत तर गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या गोव्यात थांबवून ठेवण्यात आल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे काल, मंगळवारी एर्नाकुलम एक्सप्रेस, कुडाळमध्ये तेजस एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस या गाड्या तीन तासांपेक्षा जास्त काळापासून उभ्या होत्या.

- Advertisement -

रेल्वे कर्माचाऱ्यांकडून रुळांवरील माती तसेच चिखल हटविण्याचे काम लागलीच सुरू करण्यात आले होते. त्यामुळे रात्री उशिरा रेल्वेवाहतूक काही प्रमाणात सुरू करण्यात आली. मात्र पेडणे बोगद्यात पुन्हा पाणी साचण्यास सुरुवात झाली. परिणामी काही गाड्या रद्द तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी दिली.

हेही वाचा – Mumbai Water Supply : तलावांत 9 दिवसांत चांगला पाऊस; 53 दिवसांच्या पाणीसाठ्याची वाढ

कोकण रेल्वेने केलेला बदल

  • वंदे भारत एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस, सावंतवाडी पॅसेंजर, तेजस एक्स्प्रेस, दिवा एक्स्प्रेस आणि मंगळुरू एक्स्प्रेस या रद्द करण्यात आल्या आहेत.
  • मंगला एक्स्प्रेसचा मार्ग बदलून तो पनवेल- लोणावळा पुणे-मिरज- लोंढा -मडगाव असा करण्यात आला आहे.
  • गाडी क्र. 19577 तिरुनेलवेली जामनगर एक्स्प्रेसचा प्रवास 09/07/2024 रोजी कुमटा येथे सुरू झाला आहे आणि आता शोरानूर जंक्शन मार्गे वळवला जाईल.
  • गाडी क्र. 16336 नागरकोइल गांधीधाम एक्स्प्रेसचा प्रवास 09/07/2024 रोजी सुरू झाला असून आता उडुपी येथून शोरानूर जंक्शन मार्गे वळविला जाईल.
  • ट्रेन क्र. 12283 एर्नाकुलम – एच. निजामुद्दीन एक्स्प्रेसचा प्रवास 09/07/2024 रोजी जोकट्टे येथे सुरू झाला आणि शोरानूर जंक्शन मार्गे वळवला जाईल.
  • गाडी क्र. 22655 एर्नाकुलम – एच. निजामुद्दीन एक्स्प्रेसचा प्रवास 10/07/2024 रोजी सुरू झाला. आता थलास्सेरी येथून तो शोरानूर जंक्शन मार्गे वळवला जाईल.
  • गाडी क्र. 16346 तिरुवनंतपुरम सेंट्रल लोकमान्य टिळक (टी) एक्स्प्रेसचा प्रवास 10/07/2024 रोजी सुरू होणारा तिरुअनंतपुरम सेंट्रल येथून 16:55 वाजता पुन्हा शेड्यूल करण्यात आला आणि शोरानूर जंक्शन मार्गे वळवला गेला.

Edited by Manoj S. Joshi

Maharashtra Rain : कोकण रेल्वे अनिश्चित काळासाठी ठप्प, 9 गाड्या रद्द तर काहींचे मार्ग बदलले
Tejasvi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejasvi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -