घरआतल्या बातम्याMaharashtra Rain: NDRF, भारतीय सैन्याच्या जादा तुकड्या महाराष्ट्रात

Maharashtra Rain: NDRF, भारतीय सैन्याच्या जादा तुकड्या महाराष्ट्रात

Subscribe

नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) च्या आठ आणखी तुकड्या या एअरलिफ्ट करण्यात आल्या. महाराष्ट्रातील पूराच्या संकटात मदतीसाठी एनडीआरएफ आणखी एक काही पथके तैनात करण्यात आली आहेत. कटक येथून या एनडीआरएफच्या तुकड्या आज दुपारच्या सुमारास एअरलिफ्ट करण्यात आल्या. येत्या तासांमध्ये महाराष्ट्रात काही भागांसाठी हवामान खात्यामार्फत रेड अलर्ट देण्यात आला आहे. हा रेड अलर्ट पाहता ही अतिरिक्त पथकांच्या नेमणुकीची तयारी एनडीआरमार्फत करण्यात आली. त्यानंतर या संपुर्ण टीमला एअरलिफ्ट करण्यात आले. तर भारतीय सैन्याच्या साऊदर्न कमांडच्याही १४ टास्क फोर्स या महाराष्ट्राच्या मदतीला धावून आल्या आहेत. या टास्क फोर्सच्या माध्यमातून बचावकार्य करण्यात येणार आहे.

- Advertisement -

भारतीय सैन्याच्या १४ टास्क फोर्सच्या माध्यमातून महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि उर्वरीत महाराष्ट्रात ज्याठिकाणी पूरजन्य स्थिती आहे, अशा ठिकाणी बचावकार्यात मदत करण्यात येणार आहे. त्यामध्ये औंध मिलिटरी स्टेशन आणि पुणे इंजिनिअर टास्क फोर्सच्या माध्यमातून अन्न पूराचा फटका बसलेल्या भागात स्थानिक प्रशासनाच्या मदतीने बचावकार्य, मदत आणि वैद्यकीय सेवा पुरवण्याचे काम करण्यात येणार आहे. तर एनडीआरएफची टीम दुसरीकडे ही महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील भागात मदत करणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या मागणीनुसार आतापर्यंत १० एनडीआरएफच्या टीम महाराष्ट्राच्या पुरात अडकलेल्या व्यक्तींच्या मदतीसाठी पाठवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये आणखी आठ तुकड्यांची भर पडली आहे. एनडीआरएफमार्फत चिपळून रत्नागिरी, कोल्हापूर, महाड याठिकाणी मदतकार्यासाठी पाठवण्यात आली आहे.

- Advertisement -

महाडच्या दुर्घटनेत तळीये गावात आतापर्यंत ३२ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर आणखी ७२ ते ७६ जण दरडीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यता आहे. या दुर्घटनेत एकुण ३२ घरे कोसळली आहेत. या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -