राज्याच्या विविध भागात ‘मुसळधार’; भंडारा, गोंदियात पूरस्थिती

मुंबईसह आसपासच्या परिसरात आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून पावसाने चांगली हजेरी लावली. मात्र सध्या मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असून, पुढील काही तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे.

मुंबईसह आसपासच्या परिसरात आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून पावसाने चांगली हजेरी लावली. मात्र सध्या मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असून, पुढील काही तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. नदी नाल्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर अनेक ठिकाणी या पावसाचा शेती पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. राज्यातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली असून, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. (maharashtra rain rainfall in various parts of the state)

आजही राज्याच्या विविध भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली असून, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असून नदी नाल्यांना पूर आला आहे. विशेष म्हणजे भंडारा जिल्हातील पुरपरीस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेला सुट्टीचे आदेश काढले आहेत. त्यानुसार, आज भंडारा जिल्ह्यातील सर्व शाळा, शिकवनी वर्ग,आंगणवाडीला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

भंडारा जिल्ह्यात मंगळवारपासून उद्भवलेल्या पुरपरीस्थिती लक्षात घेता भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. या आदेशाचे उलंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

याशिवाय, वैनगंगा नदीला पूर आला आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं आणि गोसीखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात वैनगंगा नदीत होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे लाखांदूर तालुक्यातील वाहणाऱ्या चूलबंद नदीवरील सर्व पुल पुराच्या पाण्याखाली आले आहेत. तसेच, लाखांदूर ते वडसा या राष्ट्रीय महामार्गावरील चाप्राळ ते सोनी रस्त्यावरून पाणी वाहू लागल्याने भंडारा ते गडचिरोली जिल्ह्याचा संपर्क तुटलेला आहे.

लाखांदूर तालुक्यातील आवली, पारसोडी,पाऊलाडवणा, या गावांना बेटाचे स्वरूप प्राप्त झाले असून पुराचा धोका वाढलेला आहे. चुलबंद नदीच्या पुलावर पुराचे पाणी चढल्याने पुल पाण्याखाली आले आहे. त्यामुळे लाखांदूर ते पवनी मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. गावाला पुराच्या पाण्याने वेढले असून अनेक घरे पाण्याखाली आले तालुका प्रशासन पूर परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नाशिक शहरातीलही नदी आणि धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. गंगापूर धरणामधून 6 हजार क्युसेकने विसर्ग करण्यात येणार आहे. नाशिक शहर व गंगापूर पाणलोट क्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर परिसरात मुसळधार पाऊस सुरु असल्याने नदी नाल्याना काही प्रमाणात पूर आला आहे.


हेही वाचा – पुणे- अहमदनगर महामार्गावर कारचा भीषण अपघात, 5 जण जागीच ठार