Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र गणरायासोबत पावसाचं आगमन; 'या' जिल्ह्यांत धो-धो पाऊस

गणरायासोबत पावसाचं आगमन; ‘या’ जिल्ह्यांत धो-धो पाऊस

Subscribe

गणरायाच्या आगमनासोबत पावसाचंही आगमन झालं आहे. हवामान विभागानं पुणे, मुंबईसह राज्यातील पाच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. राज्यातील अन्य भागात ग्रीन असर्ट असणार आहे. परंतु सर्वत्र मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे

राज्यात काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. मंगळवारी घराघरात गणरायचं आगमन झालं आहे. ढोल, ताशांच्या गजरात मिरवणूक काढत लाडक्या बाप्पाला घरी आणि सार्वजनिक गणेश मंडळात विराजमान करण्यात आलं. गणरायाच्या आगमनासोबत पावसाचंही आगमन झालं आहे. हवामान विभागानं पुणे, मुंबईसह राज्यातील पाच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. राज्यातील अन्य भागात ग्रीन असर्ट असणार आहे. परंतु सर्वत्र मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. (Maharashtra Rain update alert The arrival of rain with Ganaraya Heavy rain in these districts)

आगामी पाच दिवस पावसाचे

गणरायाचे स्वागत पावसानं झाल्यानंतर पुढील पाच दिवस पावसाचे असणार आहेत. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज 24 सप्टेंबरपर्यंत दिला आहे. विदर्भात 23 सप्टेंबरपर्यंत पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर कायम आहे. मध्य प्रदेशात यामुळे जोरदार पाऊस सुरू आहे.

मुंबईसह उपनगरांत पाऊस

- Advertisement -

मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, कल्याण जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून पाऊस सुरू आहे. मंगळवारी सकाळी अंबरनाथ, उल्हासनगरमध्ये मुसळधार पाऊस झाला. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. नाशिक शहरात पाऊस सुरू आहे.

हवामा खात्यानं छत्रपती संभाजीनगर, जालना,वर्धा, नागपूर, नंदूरबार या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असंही आवाहन करण्यात आलं आहे.

- Advertisement -

तर दुसरीकडे हवामान खात्यानं कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातली काही जिल्ह्यांचा पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय पुणे शहर, मुंबई, ठाणे,पालघर, कोकणात मंगळवारी पाऊस असणार आहे. मंगळवारी गणरायाचं आगमनदेखील पावसातच होणार आहे.

(हेही वाचा: महायुतीत वाद; बीडमध्ये पडळकरांचा पुतळा जाळला; दिसतील तिथे चोपणार, अजित पवार गट आक्रमक )

- Advertisment -