घरमहाराष्ट्रRain Update: मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस; राज्यात आगामी दोन दिवस सर्वत्र वादळी...

Rain Update: मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस; राज्यात आगामी दोन दिवस सर्वत्र वादळी पावसाचा धोका

Subscribe

पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामूळे पाऊस लांबण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे मुंबईसह राज्यात आगामी २ ते ३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्यानुसार आज सकाळपासूनचं मुंबईसह उपनगरात अधूनमधून मुसळधार पाऊस कोसळत असल्याचे दिसतेय. यासह हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांना येलो अलर्ट जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेने देखील आपल्या सर्व विभागांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. तसेच राज्यभरात सर्वत्र गेल्या आठवड्यापासून बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, आता हवामान खात्याकडून येत्या ४८ तासांसाठी राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उद्याही राज्यात कमी अधिक प्रमाणात राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

भारतीय हवामान खात्याने कोल्हापूर, सांगली, अहमदनगर, औरंगाबाद, बुलडाणा, अकोला, परभणी आणि नांदेड हे आठ जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी वेगवान वाऱ्याच्या साथीने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील वाशीम, यवतमाळ, अमरावती, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रात घाट परिसरात विजांसह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुणे, नाशिक, साताऱ्यातील घाट माथ्यावर चांगल्या पावसाचा अंदाज आहे. तर सोलापूर, नंदुरबार, धुळे, जळगावमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी यलो अलर्ट जारी केला आहे

- Advertisement -

IMD ने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, सध्या पूर्व राजस्थान आणि लगतच्या मध्य प्रदेशाच्या काही भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. यासह देशाच्या पूर्व व मध्य भागात आजपासून पावसाचे प्रमाण वाढणार आहे. प्रामुख्याने मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.


भारत दौऱ्यावरून परतलेल्या अमेरिकेच्या CIA अधिकाऱ्याला हवाना सिंड्रोम! भारतातील पहिलंच प्रकरण

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -