राज्याच्या ‘या’ भागांत रेड अलर्ट जारी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाले आहेत. नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागत आहे.

monsoon update heavy rains expected in maharashtra for next 5 days imd alert

राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाले आहेत. नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागत आहे. अशातच हवामान विभागाने राज्यातील रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), पालघर (Palghar), पुणे (Pune), कोल्हापूर (Kolhapur), नाशिक (Nashik) आणि गडचिरोली या शहरांना (Gadchiroli) आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. (maharashtra rain update rains will continue in state even today red alert issued district)

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग, मुंबई, सातारा, मराठवाडा आणि चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आहे. राज्यात गेल्या २४ तासांत पावसामुळे ९ जणांचा मृत्यू झाला आहे. पाऊस आणि पुरामुळे आतापर्यंत ७० हून अधिक लोकांचे बळी गेले आहेत. पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे.

पुणे

पुण्यात सतत पडणाऱ्या पावसाने खडकवासला धरण ७५ टक्के भरले आहे. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडतो आहे. धरणातून १ हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होणार आहे.

नाशिक

जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरातील पहिली ते बारावीच्या सगळ्या शाळा आज बंद राहणार आहे. नाशिक जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केल्यानं प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे गोदावरी नदीला मोसमातील पहिला पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना खबरदारीचा इशारा दिला आहे.

धुळे

धुळ्यात पावसाची सततधार कायम आहे. त्यामुळे असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अक्कलपाडा धरणातून दोन हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून पांझरा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

पालघर

जव्हार, मोखाडा तालुक्यात मुसळधार पाऊस पडतो आहे. जव्हार तालुक्यातील वावर वांगणी येथील नदीला मोठा पूर आला आहे. परिणामी आठ गावांचा संपर्क तुटला आहे.

नंदुरबार

नवापूर तालुक्यातील शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तालुक्यातील नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. गोमाई, शिवण, नागन,नदी काठावरील. गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नवापूर शहरातील रंगावली काठावरील 100 घरातील 400 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे

गडचिरोली

मुसळधार पावसामुळे गडचिरोलीत पुरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीची पाहणी करण्यात आली असून गडचिरोली जिल्ह्यात १२ आणि १३ तारखेला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. पुढील ४८ तासात गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सोमवारी रात्री मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी परिस्थितीची पाहणी करुन बैठक घेतली.


हेही वाचा – मुसळधार पावसामुळे मुंबईसाठी पुढील २ दिवस सतर्कतेचा इशारा