घरताज्या घडामोडीमुंबईत पावसाची दडी; राज्यात आजही हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

मुंबईत पावसाची दडी; राज्यात आजही हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

Subscribe

मुंबईसह राज्यभरात परतीच्या पावसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे काही रस्ते पाण्याखाली गेले आहेत. शिवाय घराघरांमध्ये पुराचे पाणी साचल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पावसाने दडी मारली आहे.

मुंबईसह राज्यभरात परतीच्या पावसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे काही रस्ते पाण्याखाली गेले आहेत. शिवाय घराघरांमध्ये पुराचे पाणी साचल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पावसाने दडी मारली आहे. मात्र, राज्याच्या अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने आजही हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (maharashtra rainfall in various parts of the state)

राज्याच्या विविध भागात परतीचा पाऊस कोसळत असून, काही ठिकाणी तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. या परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसत आहे. शेती पिकांचे मोठे नुकसान या पावसाने झाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज उत्तर महाराष्ट्र वगळता संपूर्ण कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

- Advertisement -

मुंबईसह ठाणे परिसरात पावसाने चांगलीच हजेरी लावली. तसेच विदर्भातील अकोला जिल्ह्यात या परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. तसेच बीड, नागपूर,गडचिरोली, चंद्रपूर, पुणे या जिल्ह्यांना पावसाने चांगलं झोडपले आहे.

बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. बीडसह माजलगाव शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. बीड तालुक्यातील नागझरी येथून उगम पावणाऱ्या बिंदुसरा नदीला देखील या पावसाने पूर आल्याने पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे नागझरी येथील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

- Advertisement -

बीड जिल्ह्यासह संपूर्ण परिसरात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. या पावसाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झालं आहे. या पावसासह वीज पडल्यामुळे मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्य भारतावर सध्या ढगांची दाटी झाली आहे. त्याचा सर्वाधिक प्रभाव मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह विदर्भात दिसून येत आहे.


हेही वाचा – काँग्रेसने वीर सावरकरांचा खुळखुळा केला; ‘सामना’तून ठाकरे गटाचा हल्लाबोल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -