घर महाराष्ट्र मराठ्यांसाठी 'राज' मैदानात; जालन्यातील आंदोलकांची घेणार भेट

मराठ्यांसाठी ‘राज’ मैदानात; जालन्यातील आंदोलकांची घेणार भेट

Subscribe

सरकारचं चुकलंच असं म्हणत राज ठाकरेंनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते. काल, रविवारी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मराठा नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी जरांगे यांच्यासोबत काल संवादही साधला होता. मात्र, आज, सकाळी 9:30 वाजता राज ठाकरे स्वत: जालन्यात जाऊन आंदोलकांशी संवाद साधणार आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज जालना दौऱ्यावर आहेत. अंतरवाडी, सराटे गावामध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. मात्र, या आंदोलनादरम्यान लाठीचार्ज झाला होता. सरकारचं चुकलंच असं म्हणत राज ठाकरेंनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते. काल, रविवारी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मराठा नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी जरांगे यांच्यासोबत काल संवादही साधला होता. मात्र, आज, सकाळी 9:30 वाजता राज ठाकरे स्वत: जालन्यात जाऊन आंदोलकांशी संवाद साधणार आहेत. (Maharashtra Raj Thackeray meet the Maratha Agitators in Jalna Maharashtra )

समोर आलेल्या माहितीनुसार, सकाळी 8:15 वाजता राज ठाकरे यांच्या औरंगाबाद विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर 8 वाजून 45 मिनिटांनी ते जालन्यातील आंतरवाडी सराटे गावात जाणार आहेत. तर सकाळी 9:30 ला ते गावात जाऊन उपोषणकर्ते आणि जखमी गावकऱ्यांची भेट घेणार आहेत.

इतिहास पाहता मराठ्यांची आंदोलनं एक आदर्श

- Advertisement -

जालना येथील घटनेवर राज ठाकरे यांनी ट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ज्यात त्यांनी म्हटलं आहे की, जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरू असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाला आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार पण झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मी याचा निषेध नोंदवतो. या घटनेवर मी कालपासून लक्ष ठेवून आहे आणि या घटनेवर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहत होतो. मुळात मराठा समाजाने आरक्षणासाठी जी आंदोलनं केली, त्या आंदोलनाचा इतिहास बघतिला, तर मी माझ्या अनेक सभांमध्ये म्हणालो तसं की, ती आंदोलन, मोर्चे याचा आदर्श जगाने घ्यावा इतकी शांततेत आणि समंजसपणे झाली होती, असं ट्वीट राज ठाकरे यांनी केलं आहे.

(हेही वाचा: Maratha Reservation Protest : शरद पवारांची भूमिका दुटप्पी; भाजपाने दिला पुरावा )

ठाकरेंचं मराठा आंदोलकांना आवाहन

- Advertisement -

राज ठाकरे म्हणाले की, माझी तमाम मराठा समजातील बांधवांना विनंती आहे की या घटनेचे पडसाद उमटू देऊ नका. तुम्ही आंदोलनं आणि मोर्च्यांचा आदर्श घालून दिला आहेत, तो खरंच वाखाणण्याजोगा आहे. तुमचा राग समजू शकतो पण तुम्ही कोणाच्या राजकारणाला आणि भूलथापांना बळी पडणार नाही याबद्दल मला आणि माझ्या पक्षाला खात्री आहे. मराठी माणसाच्या आक्रोशातून उभ्या राहणाऱ्या कुठल्याही आंदोलनाच्या पाठीशी मनसे आजपर्यंत उभी राहिली आहे.

- Advertisment -