घरCORONA UPDATEमहाराष्ट्रात करोना बाधितांची संख्या ३०२ वर, एकट्या मुंबईत ५९ रुग्ण

महाराष्ट्रात करोना बाधितांची संख्या ३०२ वर, एकट्या मुंबईत ५९ रुग्ण

Subscribe

महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा ३०२ झाला आहे. तर एकट्या मुंबईत ५९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढता दिसत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारतर्फे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अशातच आता महाराष्ट्राची चिंता अधिक वाढली आहे. कारण महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा ३०२ झाला आहे. तर एकट्या मुंबईत ५९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने दिली आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये देखील भीतीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

मुंबईत एकाच दिवशी ५९ रुग्ण आढळले आहेत. तर, त्या पाठोपाठ १३ रुग्ण मुंबई परिसरातील शहरी भागातील आहेत तर ५ रुग्ण पुण्याचे, ३ नगरचे आणि २ बुलढाणा येथे आढळले असून सर्वाधिक संख्या मुंबईत आहे. त्यामुळे, नक्कीच महाराष्ट्र सर्वात मोठ्या धोक्याच्या उंबरठ्यावर आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आतापर्यंत महाराष्ट्रात संसर्गातून रुग्ण आढळत नसल्याचा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात येत होता. पण, आता संसर्गातून पॉझिटिव्ह रुग्ण समोर येत आहेत. त्यामुळे, मुंबईसह महाराष्ट्रात ही चिंतेची बाब आहे.

दरम्यान, मुंबईत आतापर्यंत एकूण १५१ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे, आता आपल्याला आधीपेक्षा जास्त सतर्क आणि काळजी घेण्याची गरज आहे. सोमवारी एकाच दिवसात ७७ नवीन रुग्णांची भर पडली आहे. सोमवारी दुपारपर्यंत २३० वर असणारा आकडा संध्याकाळी थेट ३०२ वर जाऊन पोहोचला. सरकारकडून चार दिवसांपूर्वी खासगी लॅबना ही कोरोना चाचणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे, गेल्या चार दिवसांत या खासगी लॅबमधून जो आकडा दिला गेला त्याचा ही समावेश सरकारच्या यादीत करण्यात आला आहे.

- Advertisement -

राज्याला समुहसंसर्गाचा धोका

महाराष्ट्र सध्या समुहसंसर्गाच्या उंबरठ्यावर आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या पत्रकार परिषदेत लोकांनी सहकार्य न केल्यामुळे हा आकडा दिवसागणिक वाढत असल्याची कबुली दिली होती. देशाच्या सर्व आंतरराष्ट्रीय, आंतरराज्यीय किंवा जिल्हापातळीवरील सीमा बंद करण्यात आल्या आहेत. लोकांचा वावर कमी झाला असला तरीही लोक अजूनही लॉकडाऊनला गांभिर्याने घेत नाही. त्यामुळे, कोरोनाचा संसर्ग आणखी वेगाने पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात मृत्यूंचा आकडा जरी कमी असला तरी वाढणारा आकडा चिंताजनक आहे.

आज आढळलेले पॉझिटिव्ह रुग्ण

  • अहमदनगर-३
  • मुंबई- ५९
  • पुणे-२
  • ठाणे-२
  • कल्याण डोंबिवली-२
  • नवी मुंबई-२

वसई विरार-२

सध्या महाराष्ट्रात किती रुग्ण?

जिल्हा / मनपा                                     बाधित रुग्ण                   मृत्यू

  • मुंबई                                                   १५१                           ७
  • पुणे ( शहर व ग्रामीण भाग )                         ४८                            १
  • सांगली २५ ०
  • मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा ३६१
  • नागपूर १६ ०
  • अहमदनगर ८०
  • यवतमाळ ४०
  • बुलढाणा ३१
  • सातारा, कोल्हापूर २०
  • औरंगाबाद, रत्नागिरी,  सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, नाशिक १
  • इतर राज्य १०एकूण ३०२१०

 


हेही वाचा – केंद्र सरकारची मोफत धान्याची घोषणा ठरली फसवी


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -