Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Maharashtra Corona Update : कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट; मृतांची संख्या मात्र वाढली

Maharashtra Corona Update : कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट; मृतांची संख्या मात्र वाढली

मागील २४ तासांत २३ हजार ८२० रुग्ण बरे होऊन घरी परतले.

Related Story

- Advertisement -

मुंबईसह महाराष्ट्रात मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, मंगळवारी कोरोना रुग्णांचा संख्येत घट झाली. राज्यात मागील २४ तासांत २७ हजार ९१८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. रविवारी ४० हजार ४१४ नवे रुग्ण, तर सोमवारी ३१ हजार ६४३ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. हा आकडा मंगळवारी कमी झाला. तसेच मागील २४ तासांत २३ हजार ८२० रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण २३ लाख ७७ हजार १२७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८५.७१ टक्के इतके आहे.

१३९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू 

मंगळवारी कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाली असली तरी मृतांची संख्या वाढलेली दिसली. मृतांची संख्या रविवारी १०८, तर सोमवारी १०२ इतकी होती. मात्र, मंगळवारी राज्यात १३९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९६ टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९६,२५,०६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २७,७३,४३६ (१४.१३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १६,५६,६९७ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आणि १७,६४९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत ४७६० नवे रुग्ण

- Advertisement -

मुंबईमध्ये मागील २४ तासांत ४७६० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबईत आतापर्यंत एकूण मृतांची संख्या ११ हजार ६७५ इतकी झाली आहे. तसेच दिवसभरात ३ हजार ३४ रुग्ण बरे होऊन घरी परतले.

- Advertisement -