Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Maharashtra Corona Update: कोरोनाचा धोका कायम! राज्यात ५५,४११ नवे रुग्ण

Maharashtra Corona Update: कोरोनाचा धोका कायम! राज्यात ५५,४११ नवे रुग्ण

शनिवारी राज्यात ३०९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला.

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात कोरोनाचा धोका कायम असून शनिवारी ५५ हजार ४११ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३३ लाख ४३ हजार ९५१ झाली असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५ लाख ३६ हजार ६८२ वर पोहोचली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,१८,५१,२३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३३,४३,९५१ (१५.३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३०,४१,०८० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून २५,२९७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात ३०९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू 

शनिवारी राज्यात ३०९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये मुंबई २८, ठाणे १८, कल्याण डोंबिवली मनपा ८, वसई विरार मनपा २८, नाशिक २१, अहमदनगर ८, जळगाव ५, पुणे १३, सोलापूर ८, जालना ७, नांदेड २८, नागपूर ४३, गोंदिया ७, गडचिरोली ८ यांचा समावेश आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.७२ टक्के एवढा आहे. आज ५३,००५ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २७,४८,१५३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.१८ टक्के एवढे झाले आहे.

मुंबईत ९३३० नवे रुग्ण

- Advertisement -

मुंबईत शनिवारी ९३३० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता एकूण रुग्णसंख्या ५ लाख १० हजार ५१२ इतकी झाली आहे. तसेच शनिवारी कोरोनामुळे २८ जणांचा मृत्यू झाला. मुंबईत आतापर्यंत एकूण ११ हजार ९४४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -