घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update: कोरोनाचा पुन्हा उद्रेक! राज्यात ५९,९०७ नवे रुग्ण 

Maharashtra Corona Update: कोरोनाचा पुन्हा उद्रेक! राज्यात ५९,९०७ नवे रुग्ण 

Subscribe

बुधवारी राज्यात ३२२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. मंगळवार पाठोपाठ बुधवारीही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५५ हजारांच्या पार गेली. बुधवारी राज्यात ५९ हजार ९०७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३१ लाख ७३ हजार २६१ झाली असून राज्यात ५ लाख ०१ हजार ५५९ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबरोबरच मृतांचा आकडाही वाढताना दिसत आहे. बुधवारी राज्यात ३२२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे आता राज्यातील मृत्यूदर १.७९ टक्के इतका झाला आहे. राज्यातील लसीकरणाचा संपत आलेला साठा, रेमडेसिवीरच्या इंजेक्शनचा तुटवडा त्यातच रुग्णसंख्या वाढीबरोबरच मृत्यूंच्या संख्येत होणारी वाढ राज्यासाठी चिंताजनक ठरत आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घसरले   

आज ३० हजार २९६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २६ लाख १३ हजार ६२७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.३६ टक्के इतके झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,११,४८,७३६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३१,७३,२६१ (१५.०० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५,७८,५३० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये, तर २१,२१२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisement -

मुंबईत १०,४४२ नवे रुग्ण 

मुंबईतही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. बुधवारी मुंबईत १० हजार ४४२ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आता एकूण रुग्णसंख्या ४ लाख ८३ हजार ०४२ इतकी झाली आहे. तसेच २४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -