Maharashtra Corona Update: राज्यात कोरोनाचा हाहाकार; ६७ हजार १२३ नव्या रुग्णांची नोंद

शनिवारी राज्यात ४१९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

Maharashtra Corona Update state reported 1134 new Covid-19 cases today with three deaths
Maharashtra Corona Update : चिंताजनक! राज्यात 1,134 कोरोनाबाधितांची नोंद, ३ जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात मागील बुधवारपासून लॉकडाऊनसदृश निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र, कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होण्याऐवजी वाढ होताना दिसत आहे. शनिवारी राज्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. शनिवारी राज्यात ६७ हजार १२३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. त्यामुळे राज्यात आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३७ लाख ७० हजार ७०७ झाली असून राज्यात सध्या ६ लाख ४७ हजार ९६६ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,३५,८०,९१३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३७,७०,७०७ (१५.९९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५,७२,५८४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये असून २५,६२३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

४१९ कोरोनाबाधितांचा मृत्यू

शनिवारी राज्यात ४१९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५९ टक्के इतका आहे. आतापर्यंत एकूण ५७ हजार ९७० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच मागील २४ तासांत ५६ हजार ७८३ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण ३० लाख ६१ हजार १७४ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८१.१८ टक्के इतके आहे.

मुंबईत ९२०२ नवे रुग्ण

शनिवारी मुंबईमध्ये ८८११ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता एकूण रुग्णसंख्या ५ लाख ७१ हजार ०१८ इतकी झाली आहे. तसेच शनिवारी कोरोनामुळे ५१ जणांचा मृत्यू झाला. मुंबईत आतापर्यंत एकूण १२ हजार ३०१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.