Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Maharashtra corona update: गेल्या २४ तासात कोरोना बळींच्या संख्येत घट, १०,९८९ नव्या...

Maharashtra corona update: गेल्या २४ तासात कोरोना बळींच्या संख्येत घट, १०,९८९ नव्या बाधितांची नोंद

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अद्याप कायम असून कोरोना बाधितांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. मंगळवारी करण्यात आलेल्या नोंदी नुसार, १० हजार ८९१ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती तर २९५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. दरम्यान, आज बुधवारी कालच्या तुलनेत कोरोना बळींच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यात गेल्या २४ तासात १०,९८९ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले तर २६१ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. त्यामुळे सध्या राज्यातील मृत्यूदर १.७४% एवढा आहे.

- Advertisement -

यासह आज १६,३७९ रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्याने राज्यात आजपर्यंत एकूण ५५,९७,३०४ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.४५% एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,७१,२८,०९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,६३,८८० (१५.७९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ११,३५,३४७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,४९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज नोंद झालेल्या एकूण २६१ मृत्यूंपैकी १७० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ९१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ४०० ने वाढली आहे. हे ४०० मृत्यू, पुणे-१४२, ठाणे-४३, नाशिक-३९, औरंगाबाद-२४, कोल्हापूर-२०, अहमदनगर-१९, उस्मानाबाद-१८, पालघर-१६, नांदेड-१३, अकोला-९, नागपूर-९, सांगली-८, सातारा-८, हिंगोली-६, रत्नागिरी-६, यवतमाळ-५, बुलढाणा-४, जालना-३, बीड-२, चंद्रपूर-२, लातूर-२, सिंधुदुर्ग-१ आणि सोलापूर-१ असे आहेत.

- Advertisement -

 

- Advertisement -