Corona In Maharashtra: राज्यात २४,८८६ नव्या रुग्णांची नोंद; ३९३ बाधितांचा मृत्यू

आज राज्यात दिवसभरात २४ हजाराहून अधिक नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ३९३ हून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

8,151 new COVID-19 cases reported in Maharashtra today

देशासह राज्यभरात कोरोनाचा संसर्ग अद्याप सुरू असल्याचेच दिसत आहे. आज राज्यात दिवसभरात २४ हजाराहून अधिक नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ३९३ हून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आज १४ हजारहून अधिक रुग्णंना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ७,१५,०२३ रुग्ण बरे झाले आहेत. तर अजूनही राज्यात २,७१,५६६ इतके Active रूग्ण असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

बरे होण्याचे प्रमाण ७०.४ टक्के

गेल्या २४ तासात राज्यात २४ हजार ८८६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३९३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आज १४ हजार ३०८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आतापर्यंत ७ लाख १५ हजार ०२३ जणांनी कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.०४ टक्के एवढे झाले आहे.

मृत्यूदर २.८३ टक्के

सध्या राज्यातील मृत्यूदर २.८३ टक्के एवढा झाला आहे. तर आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५० लाख ७२ हजार ५२१ नमुन्यांपैकी १० लाख १५ हजार ६८१ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर सध्या राज्यात १६ लाख ४७ हजार ७४२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर ३८ हजार ४८७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


हेही वाचा – कोरोनामध्ये साडेचार लाखांहून अधिक युनिट रक्त संकलन; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद