घरताज्या घडामोडीCoronavirus in Maharashtra: राज्यात ६ हजार ३९७ नवे कोरोनाबाधित; ३० जणांचा मृत्यू

Coronavirus in Maharashtra: राज्यात ६ हजार ३९७ नवे कोरोनाबाधित; ३० जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात आज कोरोनाबाधितांची आकडेवारीत ६ हजार नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर ३० जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोकेवर काढले आहे. मात्र, आजची कोरोनाबाधितांची आकडेवारी दिलासादायक आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाबाधितांची आकडेवारी ही ८ हजार इतकी होती. मात्र, आज राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशी घट झाली आहे. राज्यात आज कोरोनाबाधितांची आकडेवारी ही ६ हजार असून ३० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५ हजारहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

- Advertisement -

५ हजार ७५४ जणांची कोरोनावर मात

राज्यात आज ६ हजार ३९७ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर ५ हजार ७५४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर राज्यात ३० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर राज्यात आजपर्यंत एकूण २० लाख ३० हजार ४५८ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील बरे होण्याचे प्रमाण ९३.९४ टक्के एवढे आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.४१ टक्के आहे.

७७ हजार ६१८ Active रुग्ण

राज्यात आजपर्यंत एकूण २०,३०,४५८ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.९४% एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६३,४६,३५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,६१,४६७ (१३.२२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,४३,९४७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,४८२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहे. सध्या राज्यात ७७ हजार ६१८ रुग्ण Active आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – पुणे पालिकेचा अर्थसंकल्प सादर, महसूलवाढीसाठी ‘या’ उपाययोजना


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -