Maharashtra Corona Update : कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली! राज्यात 24 तासात 711 नवे रुग्ण तर 360 कोरोनामुक्त

दरम्यान देशाचा विचार केला असता, देशातील नव्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सातत्याने घट होत आहे.

maharashtra reports 711 new covid19 cases today active cases stand at 3475 and 366 discharged
Maharashtra Corona Update : कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली! राज्यात 24 तासात 711 नवे रुग्ण तर 360 कोरोनामुक्त

राज्यात कोरोना संसर्ग आटोक्यात येत असल्याने राज्य सरकारने सर्व कोरोनासंबंधित निर्बंध हटवले. तसेच मास्क सक्तीचा निर्णयही रद्द केला, दरम्यान यानंतही राज्यातील कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याचे दिसत होते. विशेषत: कोरोना मृतांची संख्या शून्यावर होती, मात्र यातून कोरोना संपला असा विचार करत असाल तर आज राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात रोज नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येत आज मोठी वाढ पाहायला मिळाली. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 711 नवे रुग्ण आढळून आले तर 366 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले. तर एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. यामुळे राज्यातील कोरोना मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे.

राज्यात आज 3475 सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधित सक्रिय रुग्ण एकट्या मुंबईत आहे. मुंबईत सध्या 2526 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरु आहेत. त्यापाठोपाठ ठाण्यातही सक्रिय रुग्णांची संख्या 413 वर पोहचली आहे.

राज्यात आत्तापर्यंत 77,35,751 कोरोना रुग्ण बरे होऊ घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनातून बरे होणाऱ्य़ा रुग्णांचे प्रमाण 98.08 टक्के इतके झाले आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 78, 87,086 झाली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचा जोर ओसरला असला नागरिकांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी योग्यती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे.

दरम्यान देशाचा विचार केला असता, देशातील नव्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सातत्याने घट होत आहे. गेल्या 24 तासांत देशात 2338 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आदल्या दिवशी देशात 2706 कोरोना रुग्ण आढळले होते तर 25 रुग्णांचा मृत्यू झाला होता.


पावसाळ्यात दुर्घटना रोखण्यासाठी मोठी घोषणा; 15 जूनपासून 7 जिल्ह्यात ‘NDRF’च्या 9 तुकड्या तैनात