घरमहाराष्ट्रशिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी निघालेल्या 10 वाहनांचा अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी निघालेल्या 10 वाहनांचा अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Subscribe

शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात दसरा मेळाव्यावरून चढाओढ पाहायला मिळत आहे. मेळाव्यासाठी दोन्ही गटाने जास्तीत जास्त कार्यकर्ते यावे यासाठी नियोजन केले आहे. यामुळे मुंबईसह महराष्ट्रभरातून अनेक कार्यकर्ते मुंबईद दाखल होत आहे. मात्र मुंबईतील बीकेसी मैदानावरील शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी निघालेल्या कार्यकर्त्यांच्या वाहनांचा औरंगाबादमध्ये अपघात झाल्याची घटना घडली आहे. औरंगाबादच्या दौलताबादजवळील समृद्धी महामार्गावर हा अपघात झाला आहे. या अपघातात 10 वाहनं एकमेकांवर आदळी असून दहाही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

शिंदे गटातील कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली एकट्या औरंगाबादमधून 500 बस मुंबईच्या दिशेने निघाल्या, तर हिंगोलीतून 200 आणि जालन्यातून 1500 खासगी वाहने मेळाव्यासाठी निघाल्या आहेत. मात्र सायंकाळी 10 वाहने एकामागून एक येत असताना दौलताबादजवळ धडकली. या अपघातात गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला नसतानाही शिंदे गटाकडून नियमांचे उल्लंघन करून वाहनं नेण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

- Advertisement -

समृद्धी महामार्गावर बेकायदा वाहतूक – दानवे

या अपघातावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, समृद्धी महामार्ग अजूनही सर्वसामान्यांसाठी वाहतुकीसाठी खुला झालेला नाही. या महामार्गाचे अनेक काम अद्याप बाकी आहे. सर्वसामान्य व्यक्ती महामार्गावरून गेल्यास त्याला हटकवले जाते. मात्र सत्तेचा दुरुपयोग करून शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी बेकायदेशीर वाहतूक करण्यात आली आहे. त्यामुळे महामार्गावरून वाहतूक करणाऱ्या लोकांवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.


लातूरमध्ये कार व एसटी धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -