घरक्राइमसांगलीत पालघर घटनेची पुनरावृत्ती होता होता टळली; चार साधूंना बेदम मारहाण

सांगलीत पालघर घटनेची पुनरावृत्ती होता होता टळली; चार साधूंना बेदम मारहाण

Subscribe

सांगलीचे एसपी दीक्षित गेडाम म्हणाले की, आम्हाला कोणतीही तक्रार किंवा औपचारिक अहवाल मिळालेला नाही, परंतु आम्ही व्हायरल व्हिडिओ पाहत आहोत आणि वस्तुस्थितीची पडताळणी करत आहोत

गेल्या दोन वर्षांपूर्वी पालघरमध्ये घडलेल्या साधूंच्या हत्याकांडाने देश हादरवून (palghar sadhu hatya) गेला होता. या घटनेचे पडसाद आजही उमटताना दिसतात. अशात सांगलीतही पालघर साधू हत्याकांडाच्या घटनेची पुनरावृत्ती होता होता टळली आहे. सांगलीत चार साधूंना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलं चोरी करणारी टोळी समजून या साधूंना बेदम मारहाण करण्यात आली. सांगलीतील जत तालुक्यातील लवंगा येथे मंगळवारी ही घटना घडली. चार साधूंवर बाळ चोरी करत असल्याच्या संशयावरून जमावाने हल्ला केला, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अनेक लोकांच्या उपस्थितीत किराणा दुकानाबाहेर लाठ्या-काठ्या घेऊन आलेला जमाव साधूंना मारहाण करताना दिसला. मात्र, याबाबत कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे पोलिसांनी या संदर्भात सांगितले. (sangli four sadhus assaulted)

या प्रकरणी सांगली पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. अशी माहिती सांगलीचे एसपी दीक्षित गेडाम यांनी दिली आहे.

- Advertisement -

नेमकी घटना काय?

उत्तर प्रदेशातील मथुरा येथून चार साधू कर्नाटकातील विजापूरहून पंढरपूर शहराच्या दिशेने कारमधून देवदर्शनासाठी जात होते. प्रवासादरम्यान या चारही साधूंनी रात्रीच्या सुमारास लवंगा गावातील एका मंदिरामध्ये मुक्काम केला. यावेळी पुन्हा सकाळी पंढरपूरच्या दिशेने त्यांनी प्रवास सुरु केला. मात्र प्रवासआधी ते गावातील एका मुलाला रस्ता विचारत होते. यावेळी उपस्थित काही स्थानिकांना ते मुलांचे अपहरण करणाऱ्या गुन्हेगारी टोळीचे भाग असल्याचा संशय आला. या संशयावरुन ग्रामस्थांनी साधूंकडे चौकशी सुरु केली. यावेळी ग्रामस्थ आणि साधू अशा दोन्ही बाजूंनी बाचाबाची झाली, जी पाहता पाहता वाढली आणि स्थानिक लोकांनी साधूंना काठ्यांनी मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ आता खूप व्हायरल होत आहे. ज्यावर अनेकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहे. तसेच मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

सांगलीचे एसपी दीक्षित गेडाम म्हणाले की, आम्हाला कोणतीही तक्रार किंवा औपचारिक अहवाल मिळालेला नाही, परंतु आम्ही व्हायरल व्हिडिओ पाहत आहोत आणि वस्तुस्थितीची पडताळणी करत आहोत. आवश्यक कारवाई केली जाईल. भाजप आमदार राम कदम यांनी देखील या घटेनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. सांगलीतील साधूंसोबत झालेल्या गैरवर्तनाचा आम्ही तीव्र निषेध आणि टीका करतो, साधूंसोबत असा गैरवर्तन आम्ही खपवून घेणार नाही. आरोपींवर कडक कारवाई केली जाईल. अशा मागणीचा एक व्हिडीओ त्यांनी पोस्ट केला आहे. यात 2020 च्या घटनेचा संदर्भ देत ते म्हणाले की, “पालघरमधील साधूंच्या हत्येप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने त्यांच्यावर अन्याय केला, परंतु महाराष्ट्राचे विद्यमान सरकार कोणत्याही साधूवर अन्याय होऊ देणार नाही.”


सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सवर सरकारची करडी नजर; चूक झाल्यास 50 लाखांपर्यंत दंड

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -