Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र पालकांच्या खिशाला लागणार कात्री, स्कूल बसचे शुल्क वाढणार

पालकांच्या खिशाला लागणार कात्री, स्कूल बसचे शुल्क वाढणार

Subscribe

स्कूल बस ओनर्स असोसिएशनच्या या निर्णयामुळे आता पालकांचा महागाईचा आणखी एक फटका बसणार आहे.

इंधनाचे दर वाढणे आणि जागतिक कारणांमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम दिसू लागला आहे. गेल्या चार महिन्यांत खाद्यपदार्थांपासून ते प्रवास करण्यापर्यंतचा खर्च वाढला आहे. आता मुलांच्या शाळेचा बसच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पालकांच्या खर्चाचं बजेट कोलमडणार आहे.

येत्या १ एप्रिलपासून मुंबईतील शालेय बसचे शुल्क आणखी वाढणार आहे. स्कूल बस असोसिएशनने हा निर्णय घेतला असून १५ ते २० टक्के भाडेवाढ होणार आहे. इंधन आणि इतर सर्व बाबी लक्षात घेता आमच्याकडे पर्यायच नसल्याचे स्कूल बस चालकांचे म्हणणे आहे. मागच्याच वर्षी वाढत्या इंधन दरवाढीचं कारण देत स्कूल बस ओनर्स असोसिएशनने स्कूल बस शुल्कात वाढ केली होती. आता पुन्हा एकदा १ एप्रिल २०२३ पासून नव्या शैक्षणिक वर्षासाठी शाळेच्या बसेसचे शुल्क वाढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या शुल्कात जवळपास १५ ते २० टक्क्यांनी वाढ होणार आहे. स्कूल बस ओनर्स असोसिएशनच्या या निर्णयामुळे आता पालकांचा महागाईचा आणखी एक फटका बसणार आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारने आखलेल्या नव्या स्क्रॅपिंग धोरणामुळे स्कूल बस चालकांचा खर्च वाढला आहे. बस गाड्यांच्या किंमतीत झालेली भरमसाठ वाढ, वाहनांचे स्पेअर पार्ट्स, टायर आणि बॅटरीच्या दरात देखील १२ ते १८ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे बसचा एकूण देखभालीचा खर्च वाढला आहे. सोबतच दिवसेंदिवस वाहतूक कोंडीत वाढ होत असल्यानं इंधनाच्या खर्चात देखील वाढ झाली असल्याकडे असोसिएशनने लक्ष वेधलं आहे.

त्यामुळे येत्या १ एप्रिलपासून शालेय बसची १५ ते २० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती ‘स्कूल बस असोशिएशन’चे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी दिली. राज्यात साधारणपणे ४४ हजार स्कूल बस आहेत. तर एकट्या मुंबईत साडे आठ हजारांच्या जवळपास स्कूल बस आहेत. साधारण प्रति विद्यार्थी १५०० किमान शुक्ल आहे. स्कूल बसच्या दरवाढीमुळे पालकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -