घरमहाराष्ट्रMaharashtra School Reopen : राज्यात १ डिसेंबरपासून सरसकट शाळा सुरु होणार; वर्षा...

Maharashtra School Reopen : राज्यात १ डिसेंबरपासून सरसकट शाळा सुरु होणार; वर्षा गायकवाड यांची माहिती

Subscribe

राज्यात १ डिसेंबरपासून सरसकट शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाची गुरुवारी बैठक पार पडली. या बैठकीत राज्यात १ ते १२ वीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनामुळे शाळा बंद होत्या. अखेर सरसकट शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागात आठवी ते बारावीच्या शाळा सुरु होत्या. दरम्यान, आता ग्रामीण भागात पहिली ते चौथी आणि शहरी भागात पहिली ते सातवीचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडी यांनी सांगितलं.

- Advertisement -

येणाऱ्या काळात आम्ही चर्चा करू. उद्या अधिकाऱ्यांशी आम्ही बोलू. आठ दिवस आम्ही पालकांशी, अधिकाऱ्यांशी चर्चा करू. सुरक्षित वातावरण कसे देता येईल यावर भर देऊ, तसंच निवासी शाळाबाबत आम्ही लवकर निर्णय घेऊ, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. तसंच, दिवाळीनंतर काय परिस्थिती आहे हे पाहून आम्हीहा निर्णय घेतला आहे, असं वर्या गायकवाड यांनी सांगितलं.

विद्यार्थी पूर्ववत जीवनात यायला हवेत म्हणून आम्ही आज शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागाचा निर्णय आल्यानंतर आम्ही या शाळा सुरू करत आहोत. मागील काळात आम्ही मोठी खबरदारी घेतली होती. ही सर्व मुले छोटी आहेत. पण तरीही या मुलांना शाळेत आणणे महत्वाचे आहे. टास्क फोर्सशी देखील आम्ही चर्चा करणार आहोत. शिक्षकांनी काय गोष्टी केल्या पाहिजेत यावर आम्ही अभ्यास केला आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -