शिंदे गटाला केंद्रात 4 मंत्रिपदं! 10 दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार?

maharashtra shiv sena politics shinde group to get 4 ministerial posts in union cabinet expansion in next 10 days

केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला शिवसेना या नावासह धनुष्यबाण चिन्ह बहाल केलं आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे शिंदे गटाला आता खरी शिवसेना म्हणून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे ठाकरेंशिवाय आता शिवसेना असणार आहे. मात्र निवडणुक आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. चिन्ह आणि नाव गेल्याने ठाकरे गटासमोर मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. मात्र या निर्णयाने शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. हा सत्याचा आणि बहुमताचा विजय असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. मात्र ठाकरे गटाने निवडणूक आयोगाचा हा निर्णय अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. अशात शिंदे गटासाठी पुन्हा एक गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे. केंद्रातील मोदी सरकारमध्ये शिंदे गटाला स्थान मिळणार असल्याचं बोललं जात आहे. जवळपास चार नेत्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार यावर चर्चा सुरु आहेत, अशात राज्याआधीच आता केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला आहे. शिंदे गटाती काही खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळाची ऑफर मिळणार आहे. त्यामुळे कोणाला संधी मिळते याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे.

शिंदे गटाला केंद्रात दोन कॅबिनेट मंत्रिपद आणि दोन राज्यमंत्रिपदे मिळणार असल्याची चर्चा आहे. यात मुंबई, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना संधी मिळू शकते असं बोललं जातं. यात राहुल शेवाळे, प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणे यांची मंत्रिमंडळात वर्षी लागण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान मोदी सरकार मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेवत केंद्रीय मंत्रिमंडळालचा विस्तार करत असल्याचं बोललं जात आहे. यात शिंदे गटाला शिवसेना नावासह आता धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याने मुंबई महापालिका निवडणूक सोप्पी जावी तसेच शिंदे गटाची भाजपला मदत व्हावी या हेतून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राहुल शेवाळेंना केंद्रीय मंत्रिपद देण्याची शक्यता आहे. तर श्रीरंग बारणे यांना मंत्रिपद देत पश्चिम महाराष्ट्रात शिंदे गटाला मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. यात विदर्भात प्रतापराव जाधव यांनाही मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा : खासगी मालमत्ता म्हणून कोणीही शिवसेनेवर अधिकार सांगू शकणार नाही, फडणवीसांचा टोला