घरमहाराष्ट्र"बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करावी", विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी

“बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करावी”, विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी

Subscribe

मुंबई : बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करावी आणि याचा कालबध्द कार्यक्रम महायुती सरकारने जाहीर करावा अशी आग्रही मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. कारण राज्यातील विविध समाजाचे आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित असताना जातनिहाय जनगणना हाच एक उपाय आहे, असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

जातनिहाय जनगणना करून सर्व माहिती लोकांसमोर मांडल्या बद्दल बिहार सरकारचे अभिनंदन करत वडेट्टीवार म्हणाले की, राहुल गांधी सातत्याने जातीनिहाय जनगणना करावी अशी मागणी करत आहे. मात्र हे सरकार त्यापासून पळ काढत आहे. या सरकारला पळ काढण्याच कारण काय असा सवाल उपस्थित करत हिंदुत्व राजकारण करताना देशात ओबीसी हिंदू नाहीत का? त्यांना आरक्षण मिळायला नको का? त्यातूनही हे सरकर पळ काढत असतील तर ते दुर्दैव असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘घड्याळ’ चिन्ह गोठवणार! शिवसेनेप्रमाणेच निवडणूक आयोगाची राष्ट्रवादीबाबत भूमिका?

वडेट्टीवार पुढे म्हणाले की, “काँग्रेसच्या काळात २०११ साली जातनिहाय जनगणना झाली होती. या जनगणनेमध्ये प्रत्येक जातीचा डेटा गोळा केलेला आहे. ती माहिती उघड करावी ही मागणी राहुल गांधी यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांतील आरक्षण कायम राहावे म्हणून ही भूमिका मांडली. मात्र त्यातही सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – इंडिया आघाडी आणि हिंदूद्वेष हे समीकरण रक्तात भिनलेले आहे, भाजपाची जोरदार टीका

एकाबाजूला ओबीसी जनजागरण यात्रा काढायची आणि दुसरीकडे या मूलभूत प्रश्नाना बगल द्यायची अशी दुट्टप्पी भूमिका सरकार घेत असून ओबीसींना हक्कापासून वंचित ठेवायचे महापाप हे सरकार करत आहे. जातनिहाय जनगणना करताना संघ आडवा येतो का? असा खोचक सवाल करत मनुवादी विचाराने तुम्ही सरकार चालवणार का? अशी विचारणा वडेट्टीवारणी केली. राज्यात विविध समाजाचे आरक्षण प्रश्न प्रलंबित आहेत त्यावर एकच उपाय जातनिहाय जनगणना हीच आहे. बहुजनांचा हिताचा विचार करून न्याय देणार का? असं म्हणत बिहारच्या धर्तीवर राज्यात जातनिहाय जनगणना करावी आणि याचा कालबध्द कार्यक्रम महायुती सरकारने जाहीर करावा अशी आग्रही मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -